हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत महिला गंभीर जखमी: गर्भातील बाळाचा मृत्यू


हायलाइट्स:

  • आयशर टेम्पोने दुचाकीला दिली धडक
  • महिला गंभीर जखमी
  • गर्भातील बाळाचा मृत्‍यू

औरंगाबाद : पत्‍नीला दुचाकीवर रुग्णालयात नेत असताना पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात पती व पत्‍नी रोडवर पडल्याने पत्‍नीच्‍या गर्भातील बाळाचा मृत्‍यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. याप्रकरणी आयशर चालक भिमसिंग तेजसिंग याला बुधवारी (२७ ऑक्टोबर) अटक करण्यात आली. त्याची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी. एम. पोतदार यांनी दिले.

या प्रकरणात विकी सुरेश भगुरे (२५, रा. साठेनगर, वाळूज, ता. गंगापूर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची पत्‍नी नऊ महिन्‍यांची गर्भवती होती. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी हा पत्‍नीला दुचाकीवर (एमएच-१७-एपी-७४१५) वाळूज येथील रुग्णालयात तपासणीसाठी नेत होते. दुपारी एक वाजेच्‍या सुमारास ओअॅसिस चौकातील सिग्नलजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव आयरशने (क्रं. आरजे-१०-जीए-७४९९) फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली.

Sameer Wankhede: वानखेडेंवरील खंडणीच्या आरोपाचा मुंबई पोलिसांकडून तपास; NCB म्हणते…

अपघातात फिर्यादी व त्‍याची पत्‍नी दुचाकीवरुन खाली पडले. फिर्यादीच्‍या पत्‍नीला कंबरेला मार लागून ती गंभीर जखमी झाली. तिला उपाचारासाठी घाटीत आणले असता उपचारादरम्यान फिर्यादीच्‍या पत्‍नीच्‍या गर्भातील नऊ महिन्‍यांचे बाळ मृत पावल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी एमाआयडीसी वाळूज पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल होऊन चालक भिमसिंग तेजसिंग (रा. राजस्‍थान) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: