हायलाइट्स:
- आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २०७ अंकांनी घसरला आणि ६११४३ अंकावर स्थिरावला.
- राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५७ अंकांच्या घसरणीसह १८२१० अंकावर बंद झाला.
- सलग दोन दिवस तेजीत असलेल्या बाजारात आज नफेखोरांनी संधी साधली.
घर खरेदीची सुवर्णसंधी; ‘या’ सरकारी बँंकेने गृहकर्ज केले स्वस्त, या दराने मिळेल कर्ज
आजच्या सत्रात सेन्सेक्समधील ३० पैकी १४ शेअर तेजीसह बंद झाले तर १६ शेअरमध्ये घसरण झाली. ज्यात पॉवरग्रीड, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, एल अँड टी, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक बँक, नेस्ले, एनटीपीसी, रिलायन्स, टाटा स्टील, एचयूएल, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक या शेअरमध्ये घसरण झाली.
शेअर बाजारातल्या तेजीचं गारुड! सात महिन्यात एक कोटी नव्या गुंतवणूकदारांचे सीमोल्लंघन
निफ्टी मंचावरील ५० पैकी २३ शेअर वधारले तर २७ शेअर घसरणीसह बंद झाले. आजच्या सत्रात एनएसई मिडकॅप्स आणि स्मॉल कॅप्समध्ये वाढ झाली. तर एक्सिस बँक, बजाज फायनान्स, केईआय इंडस्ट्रीज, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, झी एन्टरटेनमेन्ट या शेअरमध्ये घसरण झाली. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स २ टक्क्यांनी वधारला होता.
खासगीकरणाचा धडाका; केंद्र सरकार करणार १३ एअरपोर्ट्सची विक्री, प्रक्रियेला आला वेग
आज जागतिक पातळीवर संमिश्र वातावरण होते तर आशियातील प्रमुख बाजारात घसरण झाली. ज्याचे पडसाद भारतीय बाजारावर उमटले. दरम्यान, बाजारात वाढती महागाई नजीकच्या काळात भांडवली बाजारात परिणाम करेल, असा अंदाज जिओजित फायनान्शील सर्व्हिसेसचे गुंतवणूक रणनीतीकर डॉ. व्ही. के विजयकुमार यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की मागील काही सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा घेतला आहे. काल गुंतवणूकदारांनी २६३९ कोटींची विक्री केली होती.
SBI खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार चार अंकी क्रमांक
काल मंगळवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ३८३ अंकांनी वधारला आणि ६१३५० अंकावर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४३ अंकांनी वधारला आणि तो १८२६८ अंकावर बंद झाला होत. दिवसभरात सेन्सेक्सने ५०० अंकांची झेप घेतली होती.