amarinder singh will meet amit shah : अमरिंदर सिंग अमित शहांना उद्या पुन्हा भेटणार, काय आहे मुद्दा?


चंदिगडः पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ( amarinder singh will meet amit shah ) भेट घेणार आहेत. भाजपसोबत युतीसाठी अट घातल्याच्या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांची अमित शहांसोबत ही भेट होणार आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या सध्याच्या आंदोलनावर संभाव्य तोडगा काढण्यासाठी २५ ते ३० जणांसह आपण अमित शहांची भेट घेणार आहोत, असं अमरिंदर सिंग यांनी सांगितलं.

शेतकरी आणि सरकारमधील वादावर आपण तोडगा काढण्यात मदत करू शकतो. कारण मी पंजाबचा माजी मुख्यमंत्री आहे आणि मी एक शेतकरी देखील आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण केंद्रीय गृहमंत्र्यांची तीनवेळा भेट घेतली आहे. शेतकरी आंदोलनावर तोडग्यासाठी पूर्वनिश्चित फॉर्म्युला असू शकत नसला, तरी चर्चेतून काहीतरी निष्पन्न होईल. कारण दोन्ही पक्ष – केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांना कृषी कायद्यांमुळे निर्माण झालेल्या संकटावर तोडगा काढायचा आहे, असं अमरिंदर सिंग म्हणाले.

‘शेतकरी नेत्यांसोबत कुठलीही बैठक नाही’

या विषयावर आपण कोणत्याही शेतकरी नेत्यासोबत बैठक घेतलेली नाही. या प्रकरणी आपण ठरवून दूर आहोत. कारण यात नेत्यांचा सहभाग नसावा, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. केंद्रासोबत शेतकरी नेत्यांच्या चार बैठका निष्फळ ठरल्या असल्या तरी अनौपचारिक चार्चा सुरू असल्याचं अमरिंदर सिंग यांनी सांगितलं.

rahul gandhi : ‘पेगाससला मंजुरी PM मोदींनी दिली की गृहमंत्री शहांनी?’, राहुल गांधींचा बोचरा सवाल

लवकरच नव्या पक्षाची घोषणा करणार

निवडणूक आयोगाकडे आपण पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी अर्ज केला आहे आणि आयोगाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ते जाहीर करू, अशी माहिती अमरिंदर सिंग यांनी दिली.

nawab malik : ‘नवाब मलिकांसह महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर दाऊद इब्राहिमचा प्रभाव’, भाजप नेत्याचा घणाघात



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: