दुचाकीवर ४ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती! सरकारने सूचना, हरकती मागवल्या


नवी दिल्लीः दुचाकीवर चालकासोबत जर चार वर्षांपर्यंतचे मूल बसले असेल तर दुचाकीचा वेग ४० किमीपेक्षा जास्त नसावा. अपघातावेळी मुलांच्या सुरक्षेसाठी हा नियम करण्यात येत आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. दुचाकीवर ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुल्यांच्या डोक्यावर बसेल असे हेल्मेट मोटरसायकलस्वाराने घालावे. यावर सरकारने सूचना आणि हरकतीही मागवल्या आहेत.

मुलांना सुरक्षा हार्नेस घालावे लागेल

मुलांना जे हेल्मेट घातले जाईल त्या हेल्मेटला भारतीय मानक ब्युरो (BIS) ची मान्यता असावी. तसं न केल्यास चालकावर कारवाई होऊ शकते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. मुलाला चालकाशी जोडण्यासाठी सेफ्टी हार्नेस लावणे आवश्यक आहे, असं ट्विटमध्ये नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

सेफ्टी हार्नेस हा एक प्रकारचा बनियान आहे, जो मुलांना घातला जातो. हा अॅडजस्टेबल असतो. त्यात बनियानला जोडलेल्या पट्ट्यांची एक जोडी आणि एक शोल्डर लूप असतो, जो चालकाने घातलेला असतो. अशा प्रकारे मुलाच्या शरीराचा वरचा भाग चालकाशी किंवा दुचाकीस्वाराशी सुरक्षितपणे जोडलेला असतो.

सेफ्टी हार्नेसबाबत, हे बीआयएसच्या सर्व नियमांनुसार असावे. वजनाने हलके आणि अॅडजस्ट करणारे असावे. वॉटरप्रूफ आणि टिकाऊ देखील असावे. यासंबंधी कोणाला काही सूचना किंवा आक्षेप असल्यास ते ईमेलद्वारे कळवू शकतात, असे मंत्रालयाने म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: