एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीच्या लढ्यात सामिल व्हा – रणजित बागल

एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीच्या लढ्यात सामिल व्हा – रणजित बागल
पंढरपूर - ऊस दर एफआरपीचे तुकडीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.केंद्र व राज्य सरकार यांच्या संगनमताने व राज्य शासनाच्या दिलेल्या संमतीमुळे हा कुटील डाव खेळला जात आहे. या विरोधात सर्व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होवून सर्वांनी या लढ्यामध्ये एकत्र यावे असे आवाहन रणजीत बागल यांनी केले.

    सोनके ता.पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एक रकमी एफआरपीच्याबाबत शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीचे आयोजन करण्यात आली होती.यावेळी बोलताना यंदाच्या ऊस गळीत हंगामा संदर्भातदेखील स्वाभिमानीची भुमिका बागल यांनी विशद केली. यंदा ऊसाचे क्षेत्र जरी जास्त असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात साखर देखील तेजीत आहे. पुढे मार्च अखेरपर्यंत हे दर असेच स्थिर राहतील अशी शक्यता आहे.इथेनॉल देखील उच्चांकी दरावर आहे . याचा फायदा मात्र थेट शेतकऱ्यांना मिळायला हवा आणि यंदा एकरकमी एफआरपीसह तीनशे रूपये मिळालेच पाहिजेत.यासाठीच यंदा हा लढा स्वाभिमानीकडुन लढला जाणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या घामाच्या दामासाठी संघर्षाची तयारी ठेवावी असेही रणजीत बागल म्हणाले.

  यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, सोनके चे माजी सरपंच तानाजी गोफणे,संतोष बागल, यशवंत बागल यांच्यासह ग्रामस्थ,प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: