पेगासस हा भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणीाची चौकशी होणार आहे. हे मोठं पाऊल आहे. यातून सत्य बाहेर येईल, असा विश्वास राहुल गांधी व्यक्त केला. आम्ही हा मुद्दा पुन्हा संसदेत मांडू. संसदेत चर्चा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. यावर चर्चा करणं भाजपला पटणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
पेगाससचा उपयोग हा मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, भाजप मंत्री आणि इतरांविरोधात केला गेला. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पेगासस वापरून डेटा मिळवत होते का? निवडणूक आयोग, सीईसी आणि विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगचा डेटा पंतप्रधानांकडे जात असेल तर ते गुन्हेगारी कृत्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
‘आम्ही पेगाससचा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता. पेगासस हा देशावर, देशाच्या संस्थांवर हल्ला आहे. आम्ही ३ प्रश्न विचारले. पेगासस कोणी विकत घेतला, कोणताही खासगी पक्ष तो विकत घेऊ शकत नाही, फक्त सरकार ते खरेदी करू शकते. ते कोणावर वापरले गेले? पेगाससचा डेटा इतर कोणत्या देशाकडे होता की तो फक्त भारत सरकारकडे होता? यापैकी एकाही प्रश्नाचं आम्हाला उत्तर मिळालं नाही. विरोधक एकजुटीने उभे राहिले. हा देशाच्या लोकशाहीवरचा हल्ला आहे, असा आरोप राहुल गांधी म्हणाले.
पेगासस प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी. पेगासससाठी पंतप्रधानांनी आदेश दिला होता किंवा गृहमंत्र्यांनी? आपल्याच देशावर इतर देशाशी संगनमत करून पंतप्रधानांनी आपल्या देशावर हल्ला केला आहे. हे आम्हाला पंतप्रधानांकडून ऐकायचं आहे, असाही आरोप राहुल गांधींनी केला.