आर्यन खानला आजही दिलासा नाही; उद्या दुपारपर्यंत सुनावणी तहकूब


हायलाइट्स:

  • आर्यन खानला आजही दिलासा नाही
  • उद्या दुपारपर्यंत सुनावणी तहकूब
  • आर्यनचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Drug Case) आजही कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. आर्यन खान प्रकरणाची सुनावणी आजही अपूर्ण राहिली असून उद्या दुपारपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.

आरोपी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या वकिलांनी आरोपींना जामीन मिळावा यासाठी कोर्टात युक्तीवाद केला. आता उद्या एनसीबीतर्फे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांचा उद्या युक्तीवाद होणार आहे. त्यानंतर हायकोर्टाकडून लगेच आदेश दिला जाण्याची शक्यता आहे किंवा निर्णय राखूनही ठेवला जाऊ शकतो.

नवा ट्विस्ट : ‘जलयुक्त’ला क्लीन चिट नाहीच; जलसंधारण सचिवांचा खुलासा

कोर्टात आज नेमकं काय घडलं?

सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडली तर अरबाझ मर्चंटची बाजू ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मांडली. तसंच अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांनी कोर्टात एनसीबीची बाजू मांडण्यासाठी कोर्टात दाखल झाले होते.

‘आजपर्यंत आरोपींना कट करस्थानाच्या आरोपाखाली अटक दाखवण्यातच आलेली नाही. अटकेच्या वेळी अमली पदार्थ बाळगणे आणि सेवन एवढ्याच आरोपाखाली कलमे लावली होती, हे त्यांचा अटक पंचनामा पाहिल्यानंतर स्पष्ट होते. एनसीबीने नंतर त्यांना कोर्टात हजर करून कोठडी मिळवताना कलम २८, २९ ही कट कारस्थानाची कलमे लावली,’ असा दावा अमित देसाई यांनी केला.

‘अमली पदार्थाचे सेवन केले, हे दाखवण्यासाठी सुद्धा रक्त तपासणी करणे आवश्यक असते, तेही एनसीबीने केलेले नाही. जसं रेव्ह पार्टीमध्ये सेवन करताना एनसीबी आरोपींना पकडते आणि नंतर त्यांची त्वरित रक्त तपासणी केली जाते. महत्त्वाचे म्हणजे कट करस्थानाच्या एनसीबीने मांडलेल्या थिअरीमध्येच आरोपी असलेल्या याच प्रकरणातील दोघांना काल एनडीपीएस कोर्टानेही जामीन मंजूर केला. क्रूझ परत आल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी सेवनाच्या आरोपाखाली एनसीबीने त्यांना अटक केली होती,’ असंही देसाई यांनी कोर्टात सांगितलं.

दरम्यान, अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग हे उद्या कोर्टात एनसीबीच्या बाजूने युक्तीवाद करतील. त्यानंतरच कोर्ट आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: