शाळेत तू मला मारायचास, असं म्हणत १७ वर्षांनी रस्त्यात भेटलेल्या वर्गमित्राला बेदम मारहाण


हायलाइट्स:

  • पुण्यातील औंधमध्ये धक्कादायक प्रकार
  • १७ वर्षांनंतर रस्त्यात भेटलेल्या वर्गमित्राला बेदम मारहाण
  • चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे: लहानपणी शाळेत असताना मारहाण करत असल्याचा राग मनात धरून वर्ग मित्राला बॅटने जबर मारहाण केल्याची घटना औंध (Aundh) परिसरात घडली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अमोल अंकुश कांबळे (वय ३३, रा. डीपी रस्ता, औंध) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार विकी शिरतर व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल व विकी बालमित्र आहेत. ते एकाच वर्गात शिकत होते. दोन दिवसांपूर्वी अमोल हे औंध परिसरातून घरी जात होते. त्यावेळी आरोपी विकी याने त्यांना रस्त्यामध्ये अडविले. मला ओळखले का अशी विचारणा विकीनं अमोलला केली. त्यावेळी अमोल याने आपण एकाच वर्गात शिकत होतो, असे सांगितले. वर्गात असताना खूप मारहाण करत होता, आता सापडला तुला सोडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्या ठिकाणहून अमोल हे घरी आले असता त्यांच्या पाठीमागे घरी येऊन त्यांना बॅटने जबर मारहाण केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा:

हे सगळं कुठवर जाणार? समीर वानखेडेंच्या विरोधात आणखी एक पंच समोर

‘लाच घेणार नाही’ अशी शपथ घेऊन बारा तास उलटत नाहीत तोच एका पोलिसाने…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: