शोएब अख्तरची Live टीव्ही शोमधून हकालपट्टी; पाहा काय झाले


नवी दिल्ली: युएईमध्ये टी-२० वर्ल्डकपला सुरुवात झाल्यापासून पाकिस्तानी क्रिकेट संघ सातत्याने चर्चेत येत आहे. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या चर्चेतून बाहेर जाण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा- फिक्सरला सिक्सर… बॉल आउट ऑफ द पार्क; हरभजन सिंगने पाकिस्तानला धडा शिकवला

पाकिस्तानमधील पीटीव्ही या वृत्तवाहिनीवर शोएब अख्तर आणि अनेक माजी क्रिकेटपटू चर्चेत सहभागी झाले होते. यात व्हिव्हिएन रिचर्ड्स, सना मीर आणि अन्य लोक होते. या चर्चेचे अँकर डॉ.नौमान करत होते. चर्चा सुरू असताना डॉ.नौमान असे काही तरी बोलेल की ज्यावर अख्तरला राग आला आणि त्याने पीटीव्हीतून राजीनामा दिला. हा सर्व प्रकार लाईव्ह कार्यक्रमात झाला.

वाचा- टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचा फॉर्म्युला सापडला; या संघांना होतोय फायदा

लाईव्ह चर्चेत अख्तर शाहीन शाह आफरीदी, हारिस रऊफ या खेळाडूं संदर्भात काही मुद्दे मांडत होता. तेव्हा डॉ.नौमान यांनी अख्तरला सुनावले की तुम्ही उद्धट बोलत आहात. मी असे म्हणत नाही की तुम्ही ओव्हर स्मार्ट आहात. पण तुम्ही शो मधून बाहेर जाऊ शकता. यावर अख्तरने, ही गोष्ट इथेच संपवतो. मी तुमच्या विरुद्ध काही बोललो नाही. जो मुद्दा होता त्यावर बोलत होतो.

वाचा- IND vs NZ: पाकिस्तानच्या विजायनंतर कसा असेल भारताचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा

टीव्हीवरील हा प्रकार झाल्यानंतर शोएब अख्तर थांबा नाही. त्याने लाईव्ह टीव्हीवर सांगितले की, मी पीटीव्हीतून राजीनामा देतोय. राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर ज्या पद्धतीने माझ्याशी व्यवहार केला गेला. मला वाटते की मी इथे थांबू नये. त्यानंतर तो शोमधून बाहेर पडला.

शोएब अख्तरने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आणि त्यानंतर स्वत:चे मत सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्याने डॉ.नौमान यांना माफी मागण्यास सांगितले आहे. परदेशी खेळाडूंसमोर माझ्या सोबत असे झाले. जे माझ्यासाठी फार वाईट होते. मी एक नॅशनल स्टार आहे. पण ज्या पद्धतीने मला वागवले गेले ते चुकीचे होते. रिचर्ड्स आणि डेव्हिड गोव्हर यांच्या समोर मला अशी वागणूक दिली गेली, जी योग्य नव्हती.

याआधी शोएब अख्तर एका वादात अडकला होता. पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर वकार युनिसने मोहम्मद रिझवानच्या नमाज पठणाबद्दल वक्तव्य केले होते. यावर शोएब काहीच बोलला नाही म्हणून त्याच्यावर टीका झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: