SBI खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार चार अंकी क्रमांक


हायलाइट्स:

  • स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ओटीपी (OTP) आधारित व्यवहार सुरू केले आहेत.
  • ग्राहकांना पहिल्यांदा त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल.
  • जो एटीएममधून पैसे काढण्यासाठी आवश्यक असेल. यामुळे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.

नवी दिल्ली : एटीएम (ATM) व्यवहार आणखी सुरक्षित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ओटीपी (OTP) आधारित व्यवहार सुरू केले आहेत. या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना ओटीपीच्या आधारेच एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. ग्राहकांना पहिल्यांदा त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल, जो एटीएममधून पैसे काढण्यासाठी आवश्यक असेल. यामुळे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.

पैसे कमविण्याची संधी; आठवडाभरात दोन आयपीओ खुले होणार, कोणते ते जाणून घ्या
एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली ही फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध लसीकरण मोहिमेसारखी आहे. फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करणे, ही आमची नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता असेल. एसबीआय (SBI) ग्राहकांना ओटीपी (OTP) आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली कशी कार्य करेल, याची जाणीव असणे आवश्यक आहे.

पॉलिसी बझारचा आयपीओ ; १ नोव्हेंबरला खुला होणार इश्यू, जाणून घ्या अधिक माहिती
ही सुविधा १० हजार रुपये आणि त्याहून अधिक पैसे काढल्यासाठी बंधनकारक आहे. या सुविधेमुळे एसबीआय ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्याशी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकवर पाठवलेल्या ओटीपीसह १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम काढता येईल. ही सुविधा १ जानेवारी २०२० पासून लागू होणार आहे.

ऐन दिवाळीत महागाईचा आगडोंब ; दोन दिवसांनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले
एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ओटीपीची आवश्यकता असेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी हा चार अंकी क्रमांक असेल, जो वापरकर्त्याला एका व्यवहारासाठी उपलब्ध करून दिला जातो. तुम्हाला जितकी रक्कम काढायची आहे, त्याबाबची माहिती दिल्यानंतर तुम्हाला एटीएम स्क्रीनवर ओटीपी प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर बँकेत नोंदणी केलेल्या तुमच्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी त्या स्क्रीनवर प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

खासगीकरणाचा धडाका; केंद्र सरकार करणार १३ एअरपोर्ट्सची विक्री, प्रक्रियेला आला वेग
ऑथेंटिकेशनची ही अतिरिक्त प्रक्रिया स्टेट बँक कार्डधारकांचे अनधिकृत एटीएम रोख काढण्यापासून संरक्षण करेल. स्टेट बँक ऑफ इंडिया मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या बाबतीत सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. एसबीआयकडे २२,२२४ शाखा आणि ६३,९०६ एटीएम (ATM/CDM) चे सर्वात मोठे नेटवर्क असून भारतात ७१,७०५ बीसी आउटलेट आहेत. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अनुक्रमे ९.१ कोटी आणि २ कोटी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: