ठाकरे-पवार माफियांचे सरकार, दिवाळीनंतर आणखी एका बँकेचा घोटाळा उघड करणार : किरीट सोमय्या


लातूर : राज्यातील ठाकरे-पवार सरकार हे माफियांचे सरकार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवरील धाडीत तब्ब्ल १६ हजार ५० कोटींची मालमत्ता आढळून आली आहे. त्यामुळे हे सरकार माफियांचे आहे. तसेच परवा माफियांप्रमाणेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सत्ताधार्‍यांनी काबीज करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे सांगून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिवाळीनंतर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील बालाघाट म्हणजेच आजचा सिद्धी शुगर आणि उदगीर तालुक्यातील तोंडार येथील प्रियदर्शनी हे दोन्ही सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले गेले आहेत.

या कारखान्यांसह अर्धाडझनभर सहकारी साखर कारखाने देशमुख परिवाराने गिळंकृत केले आहेत असा आरोप करत दिवाळीनंतर हे सर्व घोटाळे उघड करणार असा इशारा आज किरीट सोमय्या यांनी लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
समीर वानखेडेंचा पाय खोलात?; NCB विरोधात आणखी एक पंच समोर, केला गंभीर आरोप
पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी प्रकल्प घोटाळ्यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाठपुरावा करण्याबाबत पाठवलेल्या पत्राचेही किरीट सोमय्या यांनी आज राऊतांना उत्तर दिले आहे. राज्य सरकारने सीबीआयला चौकशी करण्यास सांगावे, आपण पाठपुरावा करू असेही सोमय्या यांनी सांगितले. जरंडेश्‍वर कारखाना प्रकरणात १८४ कोटी संपत्ती सापडली. मात्र शरद पवार आणि अजित पवार हे बनवाबनवी करीत असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: