समीर वानखेडेंचा पाय खोलात?; NCB विरोधात आणखी एक पंच समोर, केला गंभीर आरोप


हायलाइट्स:

  • समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात
  • प्रभाकर साईल नंतर आणखी एक पंच समोर
  • वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा आरोप

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून NCB च्या विशेषत: समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात सुरू झालेले आरोप दिवसागणिक वाढत आहेत. आर्यन प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोप एक पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केल्यानंतर आता आणखी एका प्रकरणातील पंच पुढं आला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दहा कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्याचा आरोप या व्यक्तीनं केला आहे.

शेखर कांबळे (Shekhar Kamble) असं या पंचाचं नाव असून तो नवी मुंबईत राहतो. खारघर येथील एका प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला पंच बनवलेलं आहे. नायजेरियन नागरिकांवर झालेल्या कारवाईचं हे प्रकरण आहे. या प्रकरणात ज्या दोघांना पकडण्यात आलं होतं, त्यांच्याकडं कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नव्हतं. असं असतानाही त्यांच्याकडं ६० ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचं नमूद करण्यात आलं, असं कांबळे यांनी सांगितलं. नायजेरियन प्रकरणात शेखर कांबळे व त्याच्या एका मित्राला पंच साक्षीदार बनवण्यात आलं होतं. दहा कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. याबद्दल विचारणा केली असता ‘आम्ही त्यावर नंतर लिहू’ असं त्यांना सांगण्यात आलं होतं. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

वाचा: ‘फडणवीसांना खंडणीखोराची वकिली करावी लागतेय, त्यांचं ही अवस्था बघवत नाही’

आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीची एकेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. एनसीबीच्याच एका अधिकाऱ्यानं काल एक निनावी पत्र व्हायरल केलं आहे. त्यात खारघरच्या प्रकरणाचा उल्लेख आहे. त्यामुळं घाबरलेल्या शेखर कांबळे यानं आज मीडियासमोर येण्याचा निर्णय घेतला. समीर वानखेडे आणि त्यांचा ड्रायव्हर अनिल माने हा मला अधूनमधून फोन करायचा. ड्रग्जवाले नायजेरिन कुठं असतील तर सांग, असं त्याला सांगितलं जायचं. एनसीबीच्या अधिकाऱ्याचं निनावी पत्र व्हायरल झाल्यानंतर शेखर कांबळेला अनिल मानेचा फोन आला होता. तू काही बोलू नको, असं अनिल मानेनं सांगितल्याचं शेखर कांबळे यांनं म्हटलं आहे. ‘कारण नसताना आम्ही यात अडकलो आहे. पण चौकशीसाठी बोलावल्यास आम्ही तयार आहोत, सत्य आहे ते सांगू,’ असं त्यानं म्हटलं आहे.

वाचा: आजच्या काळात हे कसले पोपट जन्मले?; राज्यपालांचा रोख कोणाकडे?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: