हायलाइट्स:
- नवाब मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा निशाणा
- ट्विटरवर फोटो पोस्ट करत केला खळबळजनक दावा
- नवाब मलिकांना क्रांती रेडकरचं उत्तर
नवाब मलिक यांनी आज सकाळीच एक ट्वीट करत समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो शेअर केला होता. तसंच, निकाह कधी व कसा झाला याबाबतबी माहिती दिली आहे. गुरुवारी ७ डिसेंबर २००८ रोजी आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे झाला होता, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच, मेहर म्हणून ३३ हजारांची रक्कम घेण्यात आली होती, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं होतं. तर, ट्वीटमध्ये त्यांनी ‘निकाह नामा’ देखील जोडला आहे. यामध्ये समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. यामुळं पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या सगळ्या प्रकरणावर क्रांती रेडकर हिने भाष्य केलं आहे. तसंच, नवाब मलिक यांचा दावा फेटाळून लावला आहे.
वाचाः ‘जलयुक्त शिवार’ योजनेला ठाकरे सरकारची क्लिन चिट; देवेंद्र फडणवीस म्हणतात…
‘निकाहनामा हा खरा आहे. समीर वानखेडे यांचा निकाहदेखील झाला होता. पण त्यांनी धर्म व जात बदलली नाहीये. माझ्या सासूबाईंच्या आनंदासाठी समीर वानखेडे यांनी निकाह केला होता. कारण त्या मुस्लिम होत्या. निकाहनाम्याचे पेपरही सासूबाईंनी बनवले होते,’ असं स्पष्टीकरण क्रांती रेडकरने दिलं आहे.
‘नवाब मलिक यांनी शेअर केलेला जन्माचा दाखला चुकीचा आहे. आमचे खासगी फोटो सर्वांसमोर आणून नवाब मलिक हे त्यांनी घेतलेल्या शपथेविरोधी काम करत आहेत. आम्ही लवकरच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करु. समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा त्यांचा एकच हेतू आहे, जेणेकरून त्यांच्या जावयाला वाचवता येईल,’ असंही क्रांती रेडकरनं म्हटलं आहे.
वाचाः ‘मराठी इण्डस्ट्रीमधील एकाचाही क्रांतीला पाठिंबा नाही याचं आश्चर्य’, अभिनेत्याचं ट्विट चर्चेत