nawab malik : ‘नवाब मलिकांसह महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर दाऊद इब्राहिमचा प्रभाव’, भाजप नेत्याचा घणाघात


इंदूरः आर्यन खानचा समावेश असलेल्या क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी चौकशी करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. यावरून आता भाजपही आक्रमक झाला आहे. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा प्रभाव आहे, असा घणाघात विजयवर्गीय यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणाच्या चुकीच्या तपासावरून समीर वानखेडे यांच्यावर अनेक वैयक्तिक आरोप केले आहेत. वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र आणि त्यांचे वडील सर्व खोटारडे आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्र सरकारचा एकही प्रामाणिक अधिकारी महाराष्ट्रात काम करू शकत नाही. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरून हेच दिसून येत आहे. दाऊद (इब्राहिम) आपल्या देशात नाही. पण त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर नक्कीच आहे, अशी बोचरी टीका विजयवर्गीय यांनी केली आहे.

समीर वानखेडे यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बनावट जन्म दाखला दिला, असा आरोप यापूर्वी नवाब मलिक यांनी केला होता. वानखेडे यांचा जन्म दाखला त्यांनी ट्विटरवर शेअर केला होता. ‘समीर दाऊद वानखेडेची फसवणूक इथून सुरू झाली, असा आरोप मलिकांनी केला होता. या गंभीर आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी विशेष एनसीबी न्यायालयात धाव घेतली आहे.

aryan khan case : आर्यन खानला अद्याप जामीन का मिळाला नाही? रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

नवाब मलिक यांनी ट्विटर हँडलवरून आपल्यावर अनेक आरोप केले आहेत. या सगळ्याशी ड्रग्स प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्या सर्व गोष्टी समोर आणण्याचा हा चुकीचा प्रयत्न केला जातोय. माझे वडील हिंदू आहेत आणि आई दिवंगत जाहिदा ही मुस्लिम होती. या सगळ्यात मलिक यांना आपल्या दिवंगत आईला आणायचे आहे का? माझी जात आणि पार्श्वभूमी तपासण्यासाठी आणि माझ्या वंशाची पडताळणी करण्यासाठी कोणीही माझ्या मूळ गावाला भेट देऊ शकतो, पण त्याने अशा प्रकारचं घाण पसरवू नये. मी हे सर्व कायदेशीररित्या लढेन आणि न्यायालयाबाहेर यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही, असं प्रत्युत्तर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर दिलं होतं.

sameer wankhede : समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप, NCB चं पथक मुंबईत येणार

एनसीबी अधिकारी वानखेडे यांच्यावर मंत्री नबाव मलिक यांनी खंडणीचा आरोप केला आहे. एनसीबीच्या पथकाने गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबरला छापा टाकून कथित ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी आतापर्यंत बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: