मोहित्यांचे वडगाव येथे शालन कलादालन येणार उभारण्यात

श्रीमती स्व.सौ.शालन आईसाहेब शिवाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ कलादालन
स्व.रामचंद्र (बापू) भैरू शिंदे. आणि स्व. कमलाबाई रामचंद्र शिंदे यांची पुण्याई….!

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमी जवळ पावन झालेल्या मोहित्यांचे वडगाव या ठिकाणी नवीन शालन कलादालन उभारण्यात येत आहे.

   कॅबिनेट मंत्री स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या आशीर्वादाने व राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या विचारातून आम्हाला नवीन प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळत आहे.

सुप्रसिद्ध चित्रकार व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड धारक हणमंत शिवाजी शिंदे यांच्या विचारातून प्रेरणेतून नवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे .त्यांच्या भवितव्यासाठी नवीन प्रेरणा मार्गदर्शनासाठी शालन कलादालन रूपात अस्तित्वात येणार आहे.

शालन कलादालन कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणार

खेडय़ाकडे चला हा महात्मा गांधीजींनी दिलेला संदेश खऱ्या अर्थाने आचरणात आणला आहे

 छंदांसाठी वेड असणार्‍यांची संख्या खूप आहे. पण छंदाचे व्यवसायात रूपांतर करणारे खूप कमी आहेत. त्यापैकीच काही नवोदित आणि कलेच्या माध्यमातून आकाशात स्वैर विहार करण्याचे स्वप्न उराशी बाळगून या क्षेत्राची निवड केलेल्या शालन कलादालन नवोदित, गरीब ,वंचित, दिव्यांग, अशा आर्टिस्टना संजीवनी ठरणार आहे.

 शरीर आणि आत्मा यांच्यातील उत्तम गुंता,सर्व धर्मीय मंत्रातील बारकावे, स्केच , वॉटर कलर, कॅनवास पेंटिंग,ऑइल,अँक्रेलिक पेंटिंग,नेम ऑफ गणेश आर्ट,सोन्या चांदीच्या ब्रशमधून बनवलेली पेंटिंगची संकल्पना, महापुरुष, युगपुरुष, नेते, अभिनेते,कलाकार, पुढारी, आदीवासी जमातीची संस्कृती, हास्यकल्लोळ करायला भाग पाडणारी कार्टून्स चित्रे असे एक ना अनेक कला चित्राच्या  माध्यमातून रेखाटलेली चित्रे.... असा चित्रांचा खजिना म्हणजे मोहित्यांचे वडगाव मधील शालन कलादालन .

 कला क्षेत्राशी गेली पंधरा-वीस वर्षे चित्रकलेशी अतूट नातं कला बघण्याची दूरदृष्टी असल्याने व्यवसाय म्हणून नाही तर केवळ कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणारा चित्रकार हणमंत शिंदे कलाकारांसाठी दैवतच ठरले आहेत. कला बघण्यासाठी कलात्मक दृष्टी असावी असं मानणारे चित्रकार हणमंत शिंदे यांचा कलेतील अभ्यास सहज दिसून येतो आणि म्हणूनच उत्तमोत्तम चित्र रेखाटणार्‍या कलाकारांना शालन कलादालन प्रेरणा ठरणार आहे.

    व्यावसायिकता व गुणवत्ता, कलाविष्काराचे स्वातंत्र्य व समाजाचे दायित्व, दिखाऊपणा व अभिरूचीची प्रगल्भता यांचा समन्वय व समतोल साधायचा तर चित्रकार हणमंत शिंदे यांच्यासारख्या कलेशी बांधिलकी मानणार्‍या समाजाभिमुख कलादालनांची आज नितांत आवश्यकता आहे. काही वास्तू अशा असतात की काळ बदलला तरी त्यांचे सांस्कृतिक महत्त्व कायम राहते. गेली अनेक वर्षे चित्रकला प्रदर्शन भरवून कला रसिकांचे मनोरंजन करणारे चित्रकार हणमंत शिंदे यांचे हे  वैविध्यपूर्ण शालन कलादालन जीवनाचे महत्त्व पटवून देणारे विद्यापीठ ठरणार आहे . 

शालन कलादालन आता पश्चिम महाराष्ट्र सांगली कडेगाव मधील मोहित्यांचे वडगाव येथे छोट्याशा गावात शालन कलादालन सुरु होत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये कलाजगतात अनेक लहान मोठे बदल झाले,पण जनसामान्यांपासून ते कलासंग्रहकांपर्यंत व नवोदित चित्रकारांपासून ते बुजुर्ग चित्रकार शिल्पकारांपर्यंत सर्वांचेच ऋणानुबंध कलेशी जुळलेले आहेत.

प्रदर्शने भरवण्यासाठी मुंबईत स्वतंत्र कलादालने आहेत. मात्र तेथे पोहोचण्याचा मार्ग तसा सोपा नाही.अनेक कलाकारांना अशा कलादालनाची उणीव भासत होती.ही उणिव भरुन काढण्यासाठी, कलाकरांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शालन कलादालन सज्ज होत आहे आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.असे कलाकार शालन कलादालनच्या माध्यमातून तयार होणार आहेत.

  चित्रकार आणि त्याची चित्रकला सर्वांना ज्ञात व्हावी,घरोघरी पोहोचावी यासाठी चित्रकार हणमंत शिंदे यांची सुरु असलेली धडपड शालन कलादालन पाहिल्यानंतर सहज लक्षात येते.

आज नवोदित असली तरी वास्तुकलेच्या दृष्टीने शालन कलादालनाला एक वेगळे महत्त्व आहे. अलंकरणापेक्षा उपयुक्तेवर भर देणारी, भारतीयत्व जपणारी आधुनिक शैली १९५०च्या दशकात रुजली.

   मोहित्यांच्या वडगावातील शालन कलादालन या कलादालनात प्रवेश करताच कलेशी संबंध नसलेलाही हरवून जाईल याची प्रचिती येते. थोडक्यात काय तर दृश्यकलेत आधुनिकतेचे जे वारे वाहू लागले, प्रयोगशील मुक्ततेचे वातावरण आले त्याच्याशी सुसंगत अशीच शालन कलादालनाची संकल्पना व रचना आहे. अनेक व्यावसायिक आर्ट गॅलरीज, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आर्ट फेअर्स, यांनी आजचे कलाजगत भारलेले आहे.आज कलेला व्यावसायिकतेमुळे जे बाजारी स्वरूप येऊ पाहते आहे.

 मात्र कला जिवंत ठेवण्यासाठी त्याला बाजारी स्वरुप न देता कलेतून मिळणारी उर्जा कायम ठेवण्यासाठी चित्रकार हणमंत शिंदे यांनी देशातील उदयोन्मुख कलाकारांसाठी या कलादालनाला सुरुवात केली आहे. या शालन कलादालना मध्ये नवोदित कलाकारांना आपल्या कलाकृती सादर करता येणार आहेत.त्यामुळे उदयोन्मुख कलाकारांना संधी मिळावी या हेतूनं सुरु केलेल्या कलादालनाला देशभरातून पसंती येत आहेच मात्र कोल्हापूर ,सांगलीकरांनीही याचा आस्वाद घ्यावा असे प्रत्येक कलाप्रेमीकारांनी आवाहन केले आहे.
कलेतुन उर्जा मिळते

कला हे माणसासाठी अभिव्यक्त होण्याचे साधन आहे. कलेतून जगण्याची सकारात्मक उर्जा मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात कलेची जोपासना केली पाहिजे. कला संस्कृतीने मानवी जीवनाचे प्रत्येक दालन समृद्ध केले आहे. कलेमुळे माणसाचे दुख विसरले जाते. एखाद्या चित्रकाराला खुणावणारे, भुलवणारे.दृष्टी हेच चित्रकाराचं साधन ,ओळख.अभिव्यक्ती ही लहानपणापासून होणार्‍या संस्कारातून,सामाजिक,जडणघडणीतून, आजूबाजूच्या परिस्थितीतून,सापेक्षतेच्या परिभाषेतून उतरत असते.त्यासाठी गरज असते ती डोळे उघडे ठेवण्याची आणि खुलेपणाने एखादी गोष्ट स्वीकारण्याची.

 शालन कलादालनाच्या माध्यमातून गावांगावात पोहोचण्याचे उद्दिष्ट्ये समोर असून विद्यार्थ्यांमध्येही कला रुजविण्याचे काम करण्यात येणार आहे.मुंबईतील धकाधकीच्या जीवनात स्थैर्य लाभत नाही.कलेसाठी आवश्यक असलेली शांतता सांगलीमध्ये आहे.म्हणूनच सांगलीमधील मोहित्यांचे वडगाव येथे कलादालन सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे.दिड महिने या आर्ट गॅलरीत चित्रे प्रदर्शनास ठेवण्यात येणार आहे.तसेच विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात आवड निर्माण व्हावी याकरीता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कसे जाल मोहित्यांचे वडगावाला ?

मोहित्यांचे वडगाव हे ठिकाण कडेगाव तालुका जिल्हा सांगली येथे आहे.कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. सागरेश्वर मंदिरा पासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित सागरेश्वर अभयारण्य आहे.स्वयंभू शिवलिंग सागरेश्वर देवस्थान मंदिर आहे .पर्यटन स्थळाच्या मार्गावर,सांगलीहून 50 किमी तर कराड पासून 28 किमी अंतरावर आहे. मोहित्यांचे वडगावला भेट देणा-या पर्यटकांचा आनंद अधिक द्विगुणित करणारे हे स्थळ आहे .

  परंतु अशा या दर्जेदार कलाकृतीच्या अनमोल कलादालनाला आता जागा कमी पडत आहे. आर्थिक अडचणीमुळे अंतर्गत सजावट व लाईटिंग अशा समस्या येथे भेडसावत आहेत.स्वत: आर्थिक चटके सोसून या निस्वार्थी कलावंताने उभारलेल्या या कलादालनाला महाराष्ट्र शासनाने, सामाजिक संस्थांनी व उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे मदतीचा हात देणे गरजेचे आहे. जर त्यांना आर्थिक मदत मिळाली तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हे एक आदर्शवत पर्यटनस्थळ होईल, यात शंका नाही. पण त्यासाठी गरज आहे ती दानशूर व्यक्तींच्या दातृत्वाची, लोकाश्रयाची..

त्यांना मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी-
Name : Hanmant Shivaji Shinde.
Bank Of India ,Branch Name : Takari ,
Savings A/c No :- 161310310000068
IFSC Code :- BKID0001613
AP – Mohite Vadgaon ,TAL – Kadegaon ,
Dist – Sangli , Pin Code No :- 415303
Maharashtra , (India )

येथे धनादेश वा रोखीने मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Google pay , phonepe,Bhim pay, Online या खालील नंबरवर तुम्ही धनादेश पाठवू शकता. माहितीसाठी 7385282483 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चित्रकार हणमंत शिवाजी शिंदे.
संस्थापक अध्यक्ष , शालन कलादालन ,
मु.पो. मोहित्यांचे वडगाव ,
तालुका – कडेगाव ,जिल्हा – सांगली ,
महाराष्ट्र,पिन कोड नंबर – 415303
मोबाईल नंबर – 7385282483

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: