पुणेः ट्रेन थांबवण्यासाठी चोरट्यांनी सिग्नलची वायर कापली; कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा


हायलाइट्स:

  • दौंड येथे कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा
  • घटनेत एक तरुण गंभीर जखमी
  • चोरट्यांनी सिग्नलची वायर कापली

म. टा. प्रतिनिधी, पुणेः काही दिवसांपूर्वी इगतपुरी- कसारा रेल्वे स्थानकादरम्यान पुष्पक एस्क्प्रेसवर दरोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एका एक्स्प्रेसवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. दौंड येथे कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा टाकला आहे. यात एक जण गंभीर जखमी झाले आहेत.

दौंड जवळील मानवी फाट्याजवळ कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा टाकून महिलांचे दागिने लुटले याचा प्रकार मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आला. दरोडेखोरांनी सिग्नलची वायर कापून हा दरोडा टाकला आहे. यावेळी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करणारा एक तरूण जखमी झाला आहे.

वाचाः दिवाळीच्या मुहूर्तावर येणार अमृता फडणवीस यांचं नवीन गाणे

याप्रकरणी दौंड रेल्वे पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. विनायक श्रीराम (वय २७, रा. सोलापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विनायक श्रीराम हे निवृत्त रेल्वे कर्मचार्‍यांचे चिरंजीव आहेत. ते बहिणीसह सोलापूरला जात होते. त्यांच्यावर दौंड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गाडी सोलापूरला रवाना झाली आहे. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर रवाना झाले असून त्यांचा शोध घेतला जातो आहे.

वाचाः फडणवीसांच्या महत्वकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ला ठाकरे सरकारची क्लीन चिट

तिघा चोरट्यांनी लुटीची प्रयत्न करुन खिडकीतून दोन महिलांच्या गळ्यातील सव्वा लाखांचे मंगळसुत्र व साखळी हिसकावून नेली. बहिणीची सोनसाखळी चोरणार्‍या या चोरट्यांना पकडण्यासाठी खाली उतरलेल्या एका निवृत्त रेल्वे कर्मचार्‍याचा मुलगा चोरट्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे.

वाचाः वानखेडेंवर पाळत ठेवत असल्याच्या आरोपांवर मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण; ते दोन पोलीस तर…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: