पैसे कमविण्याची संधी; आठवडाभरात दोन आयपीओ खुले होणार, कोणते ते जाणून घ्या


हायलाइट्स:

  • फिनो पेमेंट्स बँकेचा पब्लिक इश्यू शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) उघडणार आहे.
  • नायका कंपनीने आपल्या आयपीओसाठी १०८५-११२५ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केली आहे.
  • कंपनीने या इश्यूमधून ५,३५५ कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.

मुंबई : जर तुम्ही आयपीओमधून पैसे कमवण्याची संधी गमावली असेल, तर काळजी करू नका. या आठवड्यात दोन कंपन्या त्यांचे इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) प्रसिद्ध करण्यास तयार आहेत. भारतीय सौंदर्य (ब्युटी) स्टार्टअप नायका (Nykaa) चालवणाऱ्या एफएसएन (FSN) ई-कॉमर्स व्हेंचर्सचा आयपीओ (IPO) गुरुवारी (२८ ऑक्टोबर) उघडेल. तर फिनो पेमेंट्स बँकेचा पब्लिक इश्यू शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) उघडणार आहे. नायका कंपनीने आपल्या आयपीओसाठी १०८५-११२५ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केली आहे. कंपनीने या इश्यूमधून ५,३५५ कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.

दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी; आदित्य बिर्ला सनलाईफ एएमसीला १७३ कोटींचा नफा
नायका आयपीओ (Nykaa IPO) –
आयपीओमध्ये ६३० कोटी रुपये किमतीच्या इक्विटी शेअरचे ताजे इश्यू प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे ४.३१ कोटी समभागांच्या विक्रीच्या ऑफरचा (OFS) समावेश आहे. नायकाच्या आयपीओमधून उभारलेल्या निधीपैकी १३० कोटी रुपये कर्ज उभारण्यासाठी वापरले जातील आणि २०० कोटी रुपये ब्रँडच्या विपणनासाठी (मार्केटिंग) वापरले जातील. ओएफएसद्वारे जे शेअर्स विकले जाणार आहेत, त्यामध्ये प्रमोटर संजय नायर फॅमिली ट्रस्ट अँड शेअरहोल्डर्स – TPG Growth IV SF प्रायव्हेट लिमिटेड, लाइटहाऊस इंडिया फंड III, लिमिटेड, लाइटहाऊस इंडिया III एम्प्लॉई ट्रस्ट, योगेश एजन्सीज अँड इन्व्हेस्टमेंट्स, जेएम फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इतर काही वैयक्तिक भागधारकांचा समावेश आहे.

ऐन दिवाळीत महागाईचा आगडोंब ; दोन दिवसांनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले
नायकाचा आयपीओ ११ नोव्हेंबर रोजी बीएसई (BSE) आणि एनएसई (NSE) वर सूचीबद्ध होईल. फाल्गुनी नायर यांनी २०१२ मध्ये एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडची स्थापना केली होती. हे एक ऑनलाइन ग्राहक तंत्रज्ञान व्यासपीठ आहे. ही कंपनी ग्राहकांना जीवनशैलीशी संबंधित उत्पादने, सौंदर्य (ब्युटी), वैयक्तिक काळजी (पर्सनल केअर) आणि फॅशन उत्पादने वितरीत करते. यात कंपनीच्या स्वतःच्या ब्रँडेड उत्पादनांचा समावेश आहे.

नामांकित ग्लोबल कंपन्यामध्ये गुंतवणूक संधी; बिर्ला म्युच्युअल फंडाने सादर केली ‘ही’ योजना
फिनो पेमेंट्स बँकेचा आयपीओ
फिनो पेमेंट्स बँकेचा (Fino Payments Bank) आयपीओ २९ ऑक्टोबर रोजी उघडेल आणि २ नोव्हेंबरला बंद होईल. या आयपीओमध्ये ३०० कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असणार आहे. यासोबतच फिनो पेटेक लिमिटेड ऑफर फॉर सेलमध्ये १.५६ कोटी शेअर्स विकणार आहे. या स्टॉकची लिस्टिंग १२ नोव्हेंबर रोजी एक्सचेंजवर होणार आहे.

या आयपीओच्या फ्रेश इश्यूमधून मिळणारी रक्कम कंपनीचा टियर १ कॅपिटल बेस वाढवण्यासाठी वापरली जाईल, ज्याद्वारे भविष्यातील गरजा पूर्ण करता येतील. फिनो पेमेंट बँक ही एक फिनटेक कंपनी आहे, जी विविध वित्तीय उत्पादने (फायनान्शियल प्रॉडक्ट) प्रदान करते. फिनो पेमेंट्स बँकेमध्ये ब्लॅकस्टोन, आयसीआयसीआय ग्रुप, भारत पेट्रोलियम आणि आयएफसीसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: