IND vs NZ: पाकिस्तानच्या विजायनंतर कसा असेल भारताचा सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग


नवी दिल्ली: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील ग्रुप बी मधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी चुरशीची लढत होणार असल्याचे दिसत आहे. भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या ३ संघात २ जागांसाठी लढत आहे. या ग्रुपमधील अफगाणिस्तानचा संघ जो स्वत: सेमीफायनलमध्ये पोहोचणार नाही. पण अन्य संघांचे गणित बिघडवू शकतो. मंगळवारी पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करून भारताचा मार्ग थोडा सोपा केला. पण टीम इंडियाचे सेमीफायनल तिकीट अद्याप पक्के झाले नाही. भारताला अजून चार सामने खेळायचे आहेत. जाणून घेऊयात ग्रुपमधील गणित….

वाचा- कोण कोणाला फसवतय; भारतीय क्रिकेट संघात चाललय तरी काय?

टी-२० वर्ल्डकपमधील भारताच्या उर्वरीत लढती

> ३१ ऑक्टोबर- न्यूझीलंडविरुद्ध, दुबई
> ३ नोव्हेंबर- अफगाणिस्तान, अबुधाबी
> ५ नोव्हेंबर- स्कॉटलंड, दुबई
> ८ नोव्हेंबर- नामीबिया, दुबई

ग्रुप बी मध्ये सध्या पाकिस्तान ४ गुणांसह अव्वल स्थानावर तर अफगाणिस्तान २ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेच्या ग्रुप फेरीतून ६ पैकी फक्त २ संघ सेमीफायनलमध्ये जाणार आहेत आणि चार संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. सुपर १२ फेरीतून फक्त ४ संघ पुढील म्हणजे सेमीफायनलमध्ये पोहोचतील. ग्रुप बी मध्ये भारतासह, पाकिस्तान, न्यूझीलंड, स्कॉटलंड, अफगाणिस्तान आणि नामीबिया हे संघ आहेत. प्रत्येक संघ पाच सामने खेळणार असल्याने सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी चार सामन्यात विजय मिळवणे गरजेचा आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. त्यामुळे आता शिल्लक चार सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागले. असे झाले तर भारत ग्रुपमध्ये दुसरे स्थान मिळवले.

वाचा- क्रिकेटच्या १५ खेळाडूंनी तालिबानला धडा शिकवला; अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे धाडसी कृत्य

पाकिस्तान संघाने ग्रुपमधील दोन तगड्या संघांचा पराभव केला आहे. आता त्याच्यासमोर जे संघ आहेत त्याच्याकडून पराभवाची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे त्याचे सेमीफायनलमधील स्थान पक्के आहे. ग्रुपमध्ये आता फक्त दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा आहे.

भारतासाठीचे समीकरण

१) भारताला पुढील चारही लढती विजय मिळवावा लागेल. त्यामुळे त्याचे ८ गुण होतील आणि ग्रुपमध्ये दुसरे स्थान मिळवत सेमीफायनलमधील स्थान पक्के होईल.

२) जर न्यूझीलंडने भारताचा पराभव केला तर टीम इंडियाच्या अडचणी वाढतील. अशा परिस्थितीत भारताचे ६ गुण होतील आणि न्यूझीलंडसमोर पुढील ३ सामन्यात कमकूवत संघ असतील. त्यांचा पराभव करून ते ८ गुणांसह सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करतील. याचा अर्थ भारताच्या जागी न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पोहोचेल.

३) अफगाणिस्तानने टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा कधीच पराभव केलेला नाही. पण यावेळी असे झाले तर टीम इंडियाचे आव्हान धोक्यात येईल. न्यूझीलंडनंतर भारताची लढत अफगाणिस्तानसोबत आहे. त्यामुळेच ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत-अफगाण लढतीनंतर ग्रुप बी मधील सेमीफायनलेच चित्र स्पष्ट होईल.

वाचा- १४ महिन्याची मुलगी आयुष्याशी झुंज देत असताना शमी देशासाठी लढत होता; ट्रोलर्सना सडतोड उत्तर

४) जर न्यूझीलंडचा भारताविरुद्ध पराभव झाला आणि अफगाणिस्तानने भारताचा पराभव केला तर सेमीफायनलची स्पर्धा आणखी चुरशीची होईल. या परिस्थतीत भारत आणि न्यूझीलंड यांचे समान म्हणजे ६ गुण होतील. अफगाणिस्तानने पाकिस्तान किंवा न्यूझीलंड यांच्यापैकी एकाचा जरी पराभव केला तर त्याचे देखील ६ गुण होतील. या परिस्थितीत भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचे प्रत्येकी ६ गुण होतील. यामुळे सेमीफायनलचे तिकिट नेट रनरेटच्या आधारावर ठरेल.

५) अफगाणिस्तानने भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड यापैकी २ संघांचा पराभव केला तर वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर होऊ शकतो. या परिस्थितीत नामिबियााच पराभव करून त्याचे १० गुण होतील आणि पाकिस्तान आणि ते सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

वाचा- सर्वात घातक पदार्पण; टी-२० वर्ल्डकपमध्ये झाला आजवरचा सर्वात मोठा विक्रम

अफगाणिस्तान खेळ बिघडवू शकतो
पाकिस्तानने दोन मोठे विजय मिळवले आहेत. त्याच्या पुढील लढतीपैकी फक्त अफगाणिस्तान टक्कर देऊ शकतो. पाकने पाच ही लढती जिंकल्यास १० गुणांसह ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील. न्यूझीलंडची स्थिती पाकिस्तान सारखी आहे. भारताला न्यूझीलंडचा पराभव करणे थोडे अवघड आहे. आजवर टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा पराभव करता आलेला नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: