Malana Fire: रात्री सर्व गाढ झोपेत असताना हिमाचलच्या कुशीतील ‘मलाणा’ गावात अग्नितांडव, ४० घरं भस्मसात


हायलाइट्स:

  • मलाणा हे कुल्लूतील ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जातं
  • गावातील लाकडाच्या घरांनी घेतला पेट
  • गाडी गावात पोहचण्यासाठी रस्ते मार्ग उपलब्ध नसल्यानं अडथळा

कुल्लू : हिमाचलचं ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलाणा गावात मंगळवारी रात्री उशिरा अग्नितांडवानं थैमान घातलं. या आगीत मोठं नुकसान झालेलं नसलं तरी गावातील जवळपास ४० घरं भस्मसात झाल्याची माहिती मिळतेय. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झालीय. गावातील आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

लाकडाच्या घरांनी घेतला पेट

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सर्व जण गाढ झोपेत असतानाच आग लागल्यानं गावात एकच गोंधळ उडाला. आग विझवण्यासाठी गावकऱ्यांकडे पुरेशा पाण्याची व्यवस्था नव्हती. तसंच गावात लाकडांची घरं असल्यानं आगीनं जवळपास गावच आपल्या वेढ्यात घेतलं.

या गावात पोहचण्यासाठी पक्का रस्ता नसल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्याही लवकर दाखल होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनानं होमगार्डच्या जवळपास १२ जवानांची एक टीम घटनास्थळावर धाडली.

जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. आगीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन पीडित गावकऱ्यांना हरएक संभाव्य मदत करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलंय.

सकाळपर्यंत गावाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचं समजतंय. या आगीत गावातील जवळपास ४० घरं भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय.

tamil nadu fire : फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; सहा जणांचा मृत्यू , ९ जण जखमी
बापरे! मेट्रो स्टेशनवर प्रवाशाकडून ५८ लाखांची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

ऐतिहासिक मलाणा गाव पर्यटकांसाठी उत्सुकतेचा विषय

गेल्या कित्येक वर्षांपासून जवळपास १७०० लोकसंख्या असलेलं मलाणा गावा पर्यटकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलंय. मलाणापर्यंत पोहचण्यासाठी पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असला तरी जगभरातील पर्यटक इथे फिरण्यासाठी दाखल होतात. या गावात पोहचण्यासाठी रस्ते मार्ग उपलब्ध नाही. डोंगराळ भागातून मार्ग काढत इथपर्यंत पोहचावं लागतं. पार्वती खोऱ्याच्या तलहटी स्थित जरी गावातून मलाणापर्यंत थेट चढाई आहे.

lakhimpur kheri case : लखीमपूर हिंसाचारावर CM योगी आदित्यनाथ यांनी दिली प्रतिक्रिया, बोलले…
aryan khan case : आर्यन खानला अद्याप जामीन का मिळाला नाही? रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: