Chattisgarh: सरकारी कार्यालयात घुसून आमदाराची गुंडागर्दी, कर्मचाऱ्याचा डोळा फोडला


हायलाइट्स:

  • काँग्रेसचे आमदार विनोद चंद्राकर यांच्यावर आरोप
  • उत्पादन शुल्क कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण
  • एका कर्मचाऱ्याला जबर दुखापत

रायपूर : छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसचे आमदार विनोद चंद्राकर यांनी सरकारी कार्यालयात घुसून गुंडागर्दी केल्याचं समोर येतंय. राज्यातील महासमुंद जिल्ह्यातील ही घटना आहे.

आपल्या समर्थकांसहीत उत्पादन शुल्क कार्यालयात घुसून इथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस आमदार विनोद चंद्राकर यांच्यावर करण्यात आलाय. मारहाणी दरम्यान एका कर्मचाऱ्याच्या डोळ्याला जबर दुखापत झाल्याचंही समोर येतंय. जखमी झालेले लीलीराम शाहू हे सरकारी कार्यालयात कारकून म्हणून काम करतात.

‘महासमुंदचे आमदार विनोद चंद्राकर सहकारी दीपक ठाकूर आणि इतर काही लोकांसोबत सरकारी कार्यालयात घुसले. त्यांनी मला मारहाण केली आणि माझा मोबाईलही हिसकावून घेतला. मी एक्साइज ऑफिसमध्ये ऑपरेटर पदावर काम करतो’ असं जखमी झालेल्या कर्मचाऱ्यानं म्हटलंय.

बापरे! मेट्रो स्टेशनवर प्रवाशाकडून ५८ लाखांची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?
tamil nadu fire : फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; सहा जणांचा मृत्यू , ९ जण जखमी

या मारहाणीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. यामध्ये आमदार महाशय पाहायला मिळत आहेत. कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, या घटनेविरुद्ध पोलिसांकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

दारुच्या दुकानांच्या बाबतीत उत्पादन शुल्क कार्यालयातील कर्मचारी आपल्या मनाप्रमाणे काम करत नसल्याची आमदार चंद्राकर यांची तक्रार होती. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचं सांगण्यात येतंय.

lakhimpur kheri case : लखीमपूर हिंसाचारावर CM योगी आदित्यनाथ यांनी दिली प्रतिक्रिया, बोलले…
Aryan Khan Case: आर्यन खानचे तिसरे वकील; मुकुल रोहतगींच्या खांद्यावर जामिनाची जबाबदारी…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: