Mumbai Local Train: लोकल प्रवासाबाबत राज्य सरकारचा नवा आदेश; ‘त्या’ कर्मचाऱ्यांनाही २ डोसची सक्ती


हायलाइट्स:

  • संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच करता येणार लोकल प्रवास.
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलेली सूट काढून घेतली.
  • राज्य सरकारने लोकल पासबाबत नव्याने जारी केला आदेश.

मुंबई: वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, पाणी पुरवठा आदी सेवेतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून अशा कर्मचाऱ्यांना लसीकरणातून सूट दिली गेली होती. मात्र, आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या शिवाय या कर्मचाऱ्यांना लोकल वा रेल्वेचा पास मिळणार नाही. ( Maharashtra Order For Local Train Travel )

वाचा: मोठा निर्णय: राज्यात सर्व कार्यालयांत मास्कसक्ती; ‘हा’ धोका टाळण्यासाठीच…

राज्य शासनातर्फे यासंदर्भात एक आदेश जारी करण्यात आला आहे. आवश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे न बघता रेल्वेचा पास देण्यात येत होता परंतु, आता लसीकरणाला सुरुवात होऊन बराच काळ झालेला आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लसींचा साठाही मुबलक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठाही सुरळीत होत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशी संबंधिताना लस अनिवार्य करण्यात आली आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वाचा:प्रभाकर साईल याला NCBचे समन्स; वानखेडेंची ‘अशी’ केली जाणार चौकशी

राज्य शासनाने याच महिन्यात ८ ऑक्टोबर रोजी लसीकरण झालेल्या व्यक्तींची व्याख्या निश्चित केली होती. त्यामध्ये ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशा व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. लोकल, पॅसेंजर ट्रेन तसेच इतर रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी संपूर्ण लसीकरणाची अट घालण्यात आली होती. याचा विस्तार करून आता यात अत्यावश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनाही सामील करण्यात आले आहे. इतर प्रवाशांना लागू असलेली अट या सर्वांनाही आता लागू असणार आहे.

वाचा: आर्यनविरुद्ध ड्रग्जची केसच होऊ शकत नाही!; वकिलांनी केला ‘हा’ दावा

आवश्यक सेवेतील कर्मचारी असोत अथवा अन्य सेवेतील कर्मचारी असोत यापुढे संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीलाच प्रवासासाठीचा युनिव्हर्सल पास दिला जाईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लोकल किंवा पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मासिक, त्रैमासिक, सहा मासिक पाससाठी हीच अट राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झाले आहे त्यांनाच लोकल रेल्वेने प्रवास करता येईल हे आता अधोरेखित झाले आहे.

वाचा: शाहरुखकडे खंडणी मागितल्याचा आरोप; ‘या’ तक्रारीने वानखेडेंच्या अडचणींत भरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: