Nawab Malik: नवाब मलिक यांनी केली मोठी घोषणा; ‘समीर वानखेडेंवरील आरोप खोटे ठरले तर मी…’


हायलाइट्स:

  • समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवर नवाब मलिक ठाम.
  • वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडेन.
  • मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांनाही दिले खुले आव्हान.

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील एनसीबीचा छोपा बोगस होता, असा दावा करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. वानखेडे यांच्यावर मलिक यांनी वैयक्तिक आरोपही केले असून हे आरोप खोटे ठरल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अशी घोषणाच आता मलिक यांनी केली आहे. ( Nawab Malik Vs Sameer Wankhede Latest News )

वाचा:प्रभाकर साईल याला NCBचे समन्स; वानखेडेंची ‘अशी’ केली जाणार चौकशी

समीर वानखेडे यांच्या जन्माच्या दाखल्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. समीर दाऊद वानखेडे या नावाने असलेला जन्माचा दाखला शेअर करत ‘इथूनच सुरू झाली सगळी घोटाळेबाजी’ असे ट्वीट मलिक यांनी केले होते. त्यानंतर हा दाखला खोटा असल्याचे व आपण धर्म बदलला नसल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले होते. मलिक यांचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले होते. समीर यांच्या वडिलांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले होते व मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनीही मलिक यांच्यावर पलटवार केला. ‘नवाब मलिक हे रोज उठून एक कोणतंतरी खोटं प्रमाणपत्र समोर आणतात आणि आम्ही खरं प्रमाणपत्र दाखवून त्यांचे आरोप फेटाळतो. तिथेच कोण घोटाळेबाजी करत आहे हे स्पष्ट होते. दुसरा मुद्दा राहिला खंडणीचा. याआधी समीर वानखेडे यांच्यावर असे आरोप का झाले नाहीत? आताच त्यांना का अडकवलं जात आहे? लोक बुद्धू नाहीत. लोकांना सगळं समजतं, असं सांगतानाच वानखेडे हे कोणत्याही पक्षाचे काम करत नाहीत तर ते एक स्वतंत्र अधिकारी आहेत आणि त्यांना त्यांचे काम करू दे, असे रेडकर यांनी मंगळवारी माध्यमांना सांगितलं.

वाचा: शाहरुखकडे खंडणी मागितल्याचा आरोप; ‘या’ तक्रारीने वानखेडेंच्या अडचणींत भर

मलिक यांनी या सर्वावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे व ते आपल्या दाव्यांवर ठाम आहेत. ‘वानखेडे कुटुंबीय सर्वांची प्रमाणपत्रे दाखवत आहेत पण समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला त्यांनी दाखवलेला नाही. त्यांचा शाळेचा दाखला, जात प्रमाणपत्रही ते दाखवत नाहीत. इथेच सगळी गोम आहे’, असे सांगताना ट्वीटरवर समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला जो मी पोस्ट केला आहे तो सरकारी अधिकृत दस्तावेज नसेल तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे खुले आव्हानच मलिक यांनी दिले. माझा आरोप खरा ठरला तर वानखेडे काय करणार, कोणता त्याग करणार, हे मात्र त्यांनी सांगावे, असेही मलिक म्हणाले. मी वानखेडे कुटुंबाची मानहानी करत आहे, असे वाटत असेल तर माझ्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करा, असे आव्हानही मलिक यांनी दिले. नवाब मलिक इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, नवाब मलिक यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडींवर चर्चा केली. एनसीबी, समीर वानखेडे यांच्याबाबत त्यांना तपशील दिला. त्यानंतर बॉलिवूडला बदनाम करण्याचं जे कारस्थान सुरू आहे त्याबाबत मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती मलिक यांनी माध्यमांना दिली.

वाचा: आर्यनविरुद्ध ड्रग्जची केसच होऊ शकत नाही!; वकिलांनी केला ‘हा’ दावा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: