चेन्नईः तामिळनाडूतील कालाकुरिची जिल्ह्यातील शंकरपूरम येथे आग लागल्याने भीषण दुर्घटना घडली आहे. शहरातील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जण जखमी झालेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमी झाले आहेत आणि इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत, त्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाईल, असं मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले.
aryan khan case : आर्यन खानला अद्याप जामीन का मिळाला नाही? रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
sameer wankhede : समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप, NCB चं पथक उद्या मुंबईत येणार