coronavirus update: काल दिलासा, आज चिंता! राज्यात करोनाचे आज हजारावर नवे रुग्ण, मृत्यूसंख्येतही वाढ


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार २०१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण १ हजार ३७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ३२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्याला काल मोठा दिलासा मिळाला असला तरी आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत तुलनेने वाढ झाली आहे. तसेच दैनंदिन मृत्यूसंख्याही वाढली आहे. मात्र, राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही २२ हजारांवर घसरली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात १ हजार २०१ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ८८९ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण १ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या १ हजार ५८६ इतकी होती. तर, आज ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या १२ इतकी होती. (maharashtra registered 1201 new cases in a day with 1370 patients recovered and 32 deaths today)

आज राज्यात झालेल्या ३२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ३८ हजार ३९५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४८ टक्के इतके आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला उद्या जामीन मिळणार का?; मुकुल रोहतगींनी कोर्टात मांडले हे महत्वाचे १० मुद्दे

सक्रिय रुग्णसंख्या होतेय कमी

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ९८१ इतकी आहे. काल ही संख्या ३२ हजार १८४ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ६ हजार ८३७ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ५५९, तर अहमदनगरमध्ये ही संख्या २ हजार ४४१ इतकी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६०९ अशी आहे. तसेच, सांगलीत एकूण ५८४ इतकी आहे. तर, सोलापुरात ही संख्या ४५१ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- समीर वानखेडेंच्या बहीण यास्मिन वानखेडेंचा नवाब मलिकांवर गंभीर आरोप; म्हणाल्या…

मुंबईत उपचार घेत आहेत ४,९३६ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ९३६ इतकी आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ६५०, रत्नागिरीत २१७ इतकी कमी झाली आहे, तर सिंधुदुर्गात ती ४०५ इतकी आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एकही सक्रिय रुग्ण नाही

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४००, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ८१ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १६ वर आली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात आज एकही सक्रिय रुग्ण नाही.

क्लिक करा आणि वाचा- शाहरुखकडे खंडणी मागितल्याचा आरोप; ‘या’ तक्रारीने वानखेडेंच्या अडचणींत भर

१,७६,१९१ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी २० लाख ८० हजार २०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ०५ हजार ०५१ (१०.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७६ हजार १९१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ९६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: