मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्याची स्पर्धा सुरू असताना वर्ल्डकप संघातून हकालपट्टी


दुबई:आयसीसी टी-२० वर्ल्डकप युएईमध्ये सुरू आहे. स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती असून आज मंगळवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत सुरू आहे. या दोन्ही संघांनी ग्रुप फेरीतील पहिली मॅच गमावली असल्याने दोघांना विजय गरजेचा आहे. या सामन्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने एक कठोर निर्णय घेतला.

वाचा- Video: मला गर्भपात करण्यास भाग पाडले; पाक कर्णधार बाबरवर खळबळजनक आरोप

संघातील स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार क्विंटन डीकॉक याला अंतिम ११ संघातून बाहेर करण्यात आले. डी कॉकला संघाबाहेर करण्याचे कारण देखील तितकेच धक्कादायक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

वाचा- सर्वात घातक पदार्पण; टी-२० वर्ल्डकपमध्ये झाला आजवरचा सर्वात मोठा विक्रम

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेणारे सर्व देश ब्लॅक लाईफ मॅटर या अभियानाला पाठिंबा देत आहेत. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्याआधी डी कॉकने सामन्यातून माघार घेतली. ही माहिती नाणेफेकीच्या वेळी समोर आली. पण यामागील खरे कारण दुसरे आहे. डी कॉकने ब्लॅक लाईफ मॅटर अभियानाला समर्थन देण्यासाठी सामन्याआधी गुढघ्यावर बसण्यास नकार दिला. यामुळेच त्याला अंतिम ११ मधून बाहेर करण्यात आले.

वाचा- क्रिकेटच्या १५ खेळाडूंनी तालिबानला धडा शिकवला; अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे धाडसी कृत्य

वाचा- १४ महिन्याची मुलगी आयुष्याशी झुंज देत असताना शमी देशासाठी लढत होता; ट्रोलर्सना सडतोड उत्तर

भारतीय विकेटकिपर दिनेश कार्तिक जो सद्या समालोचन करत आहे, त्याने ही गोष्ट सोशल मीडियावरून जाहीर केली. डी कॉक आजची मॅच खेळत नाही कारण त्याने BLM ला पाठिंबा दिला नाही. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी या अभियानाला पाठिंबा दिला होता. तेव्हा खेळाडूंनी गुढघ्यावर बसून किंवा हात वर करून समर्थन दिले होते. तेव्हा डी कॉकने अशी कोणतीह कृती केली नव्हती. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या बोर्डाने सर्व खेळाडूंनी या अभियानाला पाठिंबा देण्याचे आदेश दिले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: