रत्नागिरीत राजकीय खळबळ: शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी?


हायलाइट्स:

  • जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड
  • शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
  • राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेच्या काही महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. याबाबत शिवेसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे यांनी मंगळवारी दापोलीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

संदीप राजपुरे यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, खेडचे तालुकाप्रमुख दत्ताराम गोठल व युवासेनेचे दापोलीचे उपतालुका अधिकारी विकास जाधव यांनी ईमेलद्वारे उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

Sameer Wankhede: शाहरुखकडे खंडणी मागितल्याचा आरोप; ‘या’ तक्रारीने वानखेडेंच्या अडचणींत भर

संदीप राजपुरे यांनी आज सांगितलं की, गेली तब्बल २५ वर्षे मी शिवसेनेचे काम करत असून नऊ वर्षे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून काम करत आहे. तर शंकर कांगणे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून सेनेचे काम करत आहेत, यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवलं आहे. विकास जाधव हे शालेय जीवनापासून शिवसेनेचं काम करत आहेत. शिवसेनेनं आम्हाला प्रचंड प्रेम दिलं, जे सच्चे शिवसैनिक आहेत त्यांनीही आम्हाला प्रचंड प्रेम, सन्मान, आदर दिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला पक्षामध्ये महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतश: ऋणी आहोत, असंही राजपुरे यांनी यावेळी नमूद केले.

sonia gandhi : काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना सोनिया गांधींनी दिला ‘डोस’! राहुल गांधीही बैठकीत उपस्थित

राजीनाम्याचा निर्णय का घेतला?

‘दापोली मतदारसंघातील अहंकारी नेतृत्वामुळे आम्हाला नाईलाजाने आमच्या पदाचा राजीनामा द्यावा लागत आहे. येथील नेतृत्व आमच्या कुणबी समाजाला मुलभूत हक्कापासून, समाजमंदिरापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे, आमच्या समाजाला कायम दुय्यम वागणूक देण्याची भूमिका पार पाडली जात आहे,’ असा आरोप करत आता हे सहन करत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे अशक्य असल्याने आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देत आहोत असं संदीप राजपुरे यांनी म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेत राजपुरे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शिवसेनेत नाराज होऊन राजीनामे दिलेले पदाधिकारी राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र याबाबत अद्याप सदर पदाधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे पुढील काळात रत्नागिरीच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: