हायलाइट्स:
- सलग दुसऱ्या सत्रात झालेल्या चौफेर खरेदीने आज मंगळवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली.
- आज बाजार बंद होताना सेन्सेक्स ३८३ अंकांनी वधारला आणि ६१३५० अंकावर बंद झाला.
- तत्पूर्वी इंट्रा डे मध्ये सेन्सेक्सने ५०० अंकांची झेप घेतली होती.
सराफा बाजारात तेजी; सलग दुसऱ्या दिवशी सोने महागले, जाणून घ्या भाव
आजच्या सत्रात रिलायन्स आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरने सेन्सेक्स-निफ्टीला सावरले. दुपारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकात नफानसुली दिसून आली होती. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली.
शेअर बाजारातल्या तेजीचं गारुड! सात महिन्यात एक कोटी नव्या गुंतवणूकदारांचे सीमोल्लंघन
मुंबई शेअर बाजाराच्या मंचावरील ३० पैकी २० शेअर तेजीसह बंद झाले. ज्यात टाटा स्टीलमध्ये सर्वाधिक ४.१३ टक्के वाढ झाली. त्याशिवाय टायटन, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, नेस्ले, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, बजाज फायनान्स, एसबीआय, एल अँड टी, बजाज ऑटो, एचडीएफसी, मारुती या शेअरमध्ये वाढ झाली.
खासगीकरणाचा धडाका; केंद्र सरकार करणार १३ एअरपोर्ट्सची विक्री, प्रक्रियेला आला वेग
दुसऱ्या बाजूला आज आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरला विक्रीची झळ बसली. इन्फोसिस, टीसीएस, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, डॉ. रेड्डी लॅब, पॉवरग्रीड , आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक या शेअरमध्ये घसरण झाली.
निफ्टी मंचावरील ५० पैकी ३९ शेअर तेजीसह बंद झाले. तर ११ शेअरमध्ये घसरण झाली. यामध्ये केईआय इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये २० टक्के वाढ झाली. बोरोसिल, टीसीआय एक्सप्रेस, बलरामपूर चीनी, गुजरात अल्कली या शेअरमध्ये वाढ झाली. आज मीडिया क्षेत्रात तेजी दिसून आली. टीव्ही १८ ब्रॉडकास्ट, हॅथवे केबल, पीव्हीआर, आयनॉक्स, झी एंटरटेनमेंट या शेअरमध्ये वाढ झाली.
सोमवारी शेअर बाजारात तेजी परतली. गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीला प्राधान्य दिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली होती. कालच्या सत्रात बँकिंग क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला होता. बाजार बंद होताना सेन्सेक्स १४५ अंकांनी वधारला आणि ६०९६९ अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये मात्र १० अंकांची किरकोळ वाढ झाली आणि निफ्टी १८१२५ अंकावर स्थिरावला.