क्षणात स्वप्न जळून खाक झालं! ८ एकर ऊसाला आग लागल्याने शेतकरी कुटुंबाचं मोठं नुकसान


हायलाइट्स:

  • आठ एकर श्रेत्रातील ऊस जळून खाक
  • शॉर्टसर्किटमुळे घडली दुर्घटना?
  • शेतकरी कुटुंबाचं मोठं नुकसान

हिंगोली : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल आठ एकर श्रेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यात घडली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ऊस पिकासह ठिबक पाईपही जळून खाक झाले आहेत.

आशाबाई बाळासाहेब गाडेकर आणि गजानन बाळासाहेब गाडेकर यांचा कळमनुरी तालुक्यात आठ एकर ऊस होता. ऊस उत्पादनातून गाडेकर यांच्या कुटुंबियांना अंदाजे १२ लाख रुपयापर्यंत उत्पादन हाती येण्याची आशा होती. परंतु अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे ऊसासोबतच या शेतकरी कुटुंबाचं स्वप्नदेखील जळून खाक झालं आहे.

Sameer Wankhede: शाहरुखकडे खंडणी मागितल्याचा आरोप; ‘या’ तक्रारीने वानखेडेंच्या अडचणींत भर

विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागल्याचे शेतकरी गाडेकर यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटलं आहे. आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर नगर जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड

या दुर्घटनेनंतर संबंधित विभागाने घटानस्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या नुकसानीची नुकसानभरपाई महावितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी गाडेकर कुटुंबियांनी केली आहे. तळहाताच्या फोडासारखं वर्षभर जपलेल्या पिकाची काही क्षणांत डोळ्यासमोर राखरांगोळी झाली आहे. आधी करोना, नंतर अतिवृष्टी आणि आता या नव्या संकटामुळे हे शेतकरी कुटुंब कोलमडून पडलं आहे. त्यामुळे आगामी काळात महावितरणकडून या कुटुंबाला काही आर्थिक मदत दिली जाते का, हे पाहावं लागेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: