Sameer Wankkhede: वरिष्ठांकडून बोलावणं नसताना समीर वानखेडे दिल्लीत का पोहचले?


हायलाइट्स:

  • एनसीबी अधिकारी समीर वानखेडे दिल्लीत
  • संशयाचं जाळं आणखीनचं घट्ट
  • वानखेडे दिल्लीत नेमके कशासाठी पोहचले?

नवी दिल्ली :आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर पडत चाललीय. याच दरम्यान, समीर वानखेडे मुंबईहून अचानक दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या लागेबांध्याबद्दल चर्चा सुरू झालीय. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलावलेलं नसतानाही समीर वानखेडे दिल्लीच्या कार्यालयात का गेले? वानखेडे यांना दिल्लीला कुणी बोलावलं? कुणाच्या सांगण्यावरून ते दिल्लीला गेले? त्यांना कुणी निरोप दिला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहेत.

एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांना समीर वानखेडे यांच्या दिल्ली भेटीसंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी ‘आपण समीर अधिकारी यांना बोलावलं नसल्याचं’ स्पष्ट केलं.

PHOTO: क्रूझवर छाप्यातही समीर वानखेडेंसोबत किरण गोसावी, फोटो व्हायरल

‘मी आज कुणालाही भेटण्यासाठी बोलावलेलं नाही. मला जर समीर वानखेडेंना प्रश्न विचारायचे असतील तर मी त्यांना बोलावून घेईल’ असं ज्ञानेश्वर सिंह यांनी मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं.

याआधी, ‘मला समन्स बजावण्यात आलेले नाहीत. मी इथे वेगळ्या कारणासाठी आलोय’ असं दिल्लीत दाखल झालेल्या समीर वानखेडे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं होतं.

दरम्यान, वानखेडे मंगळवारी दुपारी १२.०० वाजल्याच्या सुमारास दिल्लीतील एनसीबी कार्यालयात दाखल झाले होते. तब्बल दोन तासांनंतर ते कार्यालयातून बाहेर पडलेले दिसले.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यानं न्यायालयासमोर दाखल केलेल्या शपथपत्रात समीर वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांच्या लाचखोरीचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत.

एनसीबीनं १० कोऱ्या कागदांवर आपल्या सह्या घेतल्याचा दावा प्रभाकर साईल यानं केलाय. प्रभाकर साईलनं आपण फरार किरण गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं म्हटलंय. खासगी व्यक्ती असलेल्या किरण गोसावीचे एनसीबी अधिकारी समीर अधिकारी आणि आर्यन खानसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आर्यन खानला हाताला पकडून घेऊन जाण्याचा अधिकारी किरण गोसावी याला कुणी दिला? असा प्रश्न यानंतर उपस्थित झाला.

Sanjay Raut: पाक विजयाचा जल्लोष, राऊतांचा गृहमंत्र्यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर निशाणा
Ashram 3 Controversy: स्क्रिप्ट वाचल्यानंतरच चित्रिकरणाला परवानगी देणार, साध्वींची नवी ‘सेन्सॉरशीप’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *