क्रिकेटच्या १५ खेळाडूंनी तालिबानला धडा शिकवला; अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे धाडसी कृत्य


अबुधाबी: अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात स्कॉटलंडचा १३० धावांनी परभव केला. या सामन्यात अफगाणच्या क्रिकेटपटूंनी शानदार खेळ केला. प्रथम फलंदाजी करत त्यांनी १९० धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर अशी गोलंदाजी केली की स्कॉटलंडचा फक्त ६० धावांत ऑलआउट केला. या शानदार विजयामुळे अफगाणिस्तानचा संघ ग्रुप बी मध्ये सर्वोत्तम रनरेटसह पहिल्या स्थानावर गेला आहे.

वाचा- सर्वात घातक पदार्पण; टी-२० वर्ल्डकपमध्ये झाला आजवरचा सर्वात मोठा विक्रम

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे क्रिकेटमुळे कौतुक होत आहे तसेच अन्य एका गोष्टीमुळे सर्वजण त्यांना शब्बासकी देत आहेत. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी एक मोठे धाडस दाखवले आणि तालिबानी दहशतवाद्यांना असे उत्तर दिले जे आजवर कोणाला जमले नाही. स्कॉटलंडविरुद्धच्या लढती आधी त्यांनी देशाचे राष्ट्रगीत म्हटले आणि राष्ट्रध्वज देखील फडकावला. राष्ट्रगीत सुरू असताना कर्णधार मोहम्मद नबीसह सर्वांच्या डोळ्यात आश्रू होते.

वाचा- १४ महिन्याची मुलगी आयुष्याशी झुंज देत असताना शमी देशासाठी लढत होता; ट्रोलर्सना सडतोड उत्तर

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मोहम्मद नबीच्या डोळ्यात आश्रू स्पष्टपणे दिसत आहेत. फक्त खेळाडूंसाठी नाही तर संपूर्ण अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी हा भावनिक क्षण होता. आंतरराष्ट्रीयस्तरावर राष्ट्रगीत आणि ध्वज पाहून प्रत्येकाला आनंद झाला. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते.

वाचा- Video: मला गर्भपात करण्यास भाग पाडले; पाक कर्णधार बाबरवर खळबळजनक आरोप

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह साहेल यांनी या घटनेचा व्हिडिओ रीट्वीट केला आहे. सालेह म्हणतात, मी देशाच्या क्रिकेट हिरोंच्या सहास आणि राष्ट्रीय मुल्यासाठीच्या त्यांच्या भावनांना सलाम करतो. त्यांनी राष्ट्रगीत म्हटले आणि पाकिस्तानी समर्थन असलेल्या तालिबानी अत्याचाराच्या विरुद्ध ध्वज फडकावला.

वाचा- ७०९०००००००० रुपये= एका IPL संघाची किमत; देशाच्या क्रीडा अर्थसंकल्पापेक्षा जास्त!

काही दिवसांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. तेव्हापासून तेथे शरिया कायदा आणि तालिबानी ध्वज लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने मोठे धाडस दावखले.

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मुजीर उर रहमानने ४ षटकात २० धावात देत ५ विकेट घेतल्या. पदार्पणाच्या सामन्यात टी-२० वर्ल्डकपमध्ये पाच विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. या शिवाय स्टार फिरकीपटू राशिद खानने ९ धावा देत ४ विकेट घेतल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: