चीनमध्ये सध्याचा करोना संसर्गाचा वेग हा भारतासह इतर देशांच्या तुलनेत अधिक कमी आहे. त्यानंतरही खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मागील २४ तासांत चीनमध्ये २९ करोनाबाधित आढळले. तर, लांझोउमध्ये फक्त सहा करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यानंतरही या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, लांझोउ शहरात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. सर्व नागरिकांना घरातच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. करोना चाचणी जेवढ्या अधिक होतील, तेवढ्या वेगाने बाधित आढळण्याची शक्यता अधिक असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले.
राजधानी बीजिंगमध्येही बाधित
राजधानी बीजिंगने शून्य करोनाबाधित संख्या गाठली होती. आता मात्र, करोनाबाधितांची संख्या ९ झाली आहे. त्यानंतर आता प्रशासनाने पुन्हा एकदा सर्व नागरिकांची करोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. पर्यटकांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.