रत्नागिरी : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आधीच राजकीय वातावरण तापलं असताना आता रत्नागिरीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. खरंतर, निवडणुकांचे वारे फिरल्यापासून अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू झालं आहे. अशात दापोलीत संदिप राजपुरे आणि नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला आहे. याचा भविष्यात शिवसेनेला नक्कीच फटका बसेल अशी चर्चा आहे.
कोणी दिला राजीनामा?
राजपूरे – दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख
शंकर कांगणे – उपजिल्हा प्रमुख
विकास जाधव – युवासेना उपतालूका प्रमुख
दत्ताराम गोठल – तालूका प्रमुख, खेड