‘या’ देशात पालकांच्या संमतीनंतरच लहान मुलांना फेसबुक वापरण्यास मुभा!


कॅनबेरा: समाज माध्यमांवरील संवेदनशील आशय व जाहिरातींमुळे अडनिड्या वयातील मुलांवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियात एक नवा कायदा येऊ घातला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार १६ वर्षांखालील मुलांना फेसबुकचा वापर करायचा असल्यास फेसबुकला त्यांच्या पालकांची संमती घ्यावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने सोमवारी या कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केला.

या डिजिटल युगात आम्ही आखलेला खासगीपणाचा कायदा उचित आहे, हे या नव्या कायद्यामुळे अधोरेखित होईल. तसेच, ऑस्ट्रेलियन नागरिक यामुळे ऑनलाइन माध्यमांचा सुरक्षित वापर करू शकतील, असे सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मुलांच्या चुकीची शिक्षा आई-वडिलांना मिळणार; ‘या’ देशात होतोय कायदा!

आपल्या यूजरचे वय हे या नव्या कायद्याच्या चौकटीत बसते की नाही याची पडताळणी फेसबुकसह सर्व सोशल मीडियांना करावी लागणार आहे. हे यूजर १६ वर्षांखालील असल्यास फेसबुकला त्यांच्या पालकांची संमती घ्यावी लागेल, तसेच या मुलांची वैयक्तिक माहिती हाताळतानादेखील फेसबुकला संमती घ्यावी लागणार आहे.

facebook fined : फेसबुकला झटका! ब्रिटनने ५० दशलक्ष युरोहून अधिकचा बजावला दंड
लहान व तरुण यूजरच्या सोशल मीडियाच्या वापरासंबंधी जगभरात करण्यात आलेल्या कायद्यांना आम्ही सहकार्य केले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने प्रसिद्ध केलेल्या या मसुद्याचा आम्ही आढावा घेत असून त्यांच्याशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया फेसबुकच्या क्षेत्रीय संचालिका मिआ गार्लिक यांनी व्यक्त केली.

कायदा कशामुळे?

ऑस्ट्रेलियातील मुले व तरुणांमधील मनोविकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात आले होते. याची कारणे वेगवेगळी असली तरी सोशल मीडियाचा वापर हे त्यामागील एक प्रमुख कारण असल्याचे आम्हाला माहीत आहे, असे मेंटल हेल्थ अँड सुसाइड प्रीव्हेन्शन मंत्रालयाचे राज्यमंत्री डेव्हिड कोलमन यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून हा कायदा आणला जात आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: