PHOTO: क्रूझवर छाप्यातही समीर वानखेडेंसोबत किरण गोसावी, फोटो व्हायरल


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानशी निगडीत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप करण्यात येत आहेत. याच प्रकरणात साक्षीदार प्रभाकर साईल यानं आपला जबाब फिरवल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावरही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. साक्षीदारानं दिलेल्या शपथपत्रात या प्रकरणात कोट्यवधींच्या देवाण-घेवाणीचाही आरोप केला आहे. या देवाण-घेवाणीतील एक भाग एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनाही दिला जाणार होता, असा दावाही या प्रकरणातील साक्षीदारानं केलाय. याच दरम्यान, समीर वानखेडे यांनी टाकलेल्या धाडीत खासगी व्यक्ती असलेला किरण गोसावी हादेखील सहभागी होता, हे स्पष्ट करणारे आणखी काही धक्कादायक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत.

​एनसीबीच्या कार्यालयातले फोटो

या फोटोमध्ये समीर वानखेडे एका खुर्चीवर बसलेले दिसत आहेत तर त्यांच्या मागे किरण गोसावी आणि भाजप कार्यकर्ता मनीष भानुशाली दिसून येत आहेत. किरण आणि मनीष क्रूझवरील ड्रग छाप्या दरम्यान वानखेडे यांच्यासोबत उपस्थित होते, हे या फोटोंतून स्पष्टपणे दिसून येतंय. इतकंच नाही तर एनसीबीच्या कार्यालयातील काही फोटोंतही किरण आणि मनीष आढळले आहेत.

​व्हॉटसअप चॅट समोर

या प्रकरणात साक्षीदार म्हणून समोर आलेल्या किरण गोसावी आणि प्रभाकर साईल यांच्यातील व्हॉटसअप चॅटही समोर आलंय. हे चॅट ३ ऑक्टोबर रोजीचं आहे. यामध्ये, किरण गोसावी साईलला कुठे जायचं? काय करायचं? याबद्दलचे आदेश देताना दिसत आहे. ‘दरवाजा बंद कर आणि चावी खिडकीच्या बाहेर फेक’ असंही गोसावीनं साईलला यावेळी सांगितलं होतं.

​पंच साक्षीदार किरण गोसावी

मुंबईमध्ये भीती वाटत असल्याचं सांगत किरण गोसावी एनसीबीचा पंच साक्षीदार फरार झाला आहे. भाजपशासित उत्तर प्रदेशात आपण आत्मसमर्पण करणार असल्याचं किरण गोसावीनं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटलं होतं. परंतु, आतापर्यंत किरण गोसावीनं आत्मसमर्पण केलेलं नाही. किरण गोसावी हा लखनऊमध्ये लपून बसल्याचं समजताच महाराष्ट्र पोलिसांचं एक पथक लखनऊला रवाना झालंय.

​नवाब मलिक यांनी विचारले प्रश्न

एससीबीच्या छाप्या दरम्यान किरण गोसावीची उपस्थिती तसंच आर्यन खानसोबत घेतलेला सेल्फी एनसीबी अधिकाऱ्यांसाठीही बराच अडचणीचा ठरतोय. गोसावी हा एनसीबीचा अधिकारी नसूनही छाप्यात काय करत होता? आर्यन खानचा हात पकडून त्याला एनसीबी कार्यालयात नेण्याचा अधिकारी किरण गोसावीला कुणी दिला? असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उचलून धरलेत. आर्यन खानसोबत सेल्फी घेणारी व्यक्ती किरण गोसावी असल्याचंही नवाब मलिक यांनीच समोर आणलं होतं.

​अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण अपुरं

एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी केलेल्या दाव्यानुसार, किरण गोसावी हा या प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार आहे. मात्र, ताब्यात घेण्यात आलेल्या आर्यन खानसोबत सेल्फी काढणं आणि आर्यनचा हात पकडून त्याला घेऊन जाण्याचा अधिकार गोसावीला कुणी दिला? याचं उत्तर मात्र अधिकाऱ्यांकडे नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: