खासगीकरणाचा धडाका; केंद्र सरकार करणार १३ एअरपोर्ट्सची विक्री, प्रक्रियेला आला वेग


हायलाइट्स:

  • एअर इंडियाच्या यशस्वी विक्रीनंतर सरकार १३ विमानतळांचे खासगीकरण करणार आहे.
  • मार्च २०२२ पर्यंत देशभरातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण करण्याचे टार्गेट सरकारने ठेवले आहे.
  • नुकताच १३ विमानतळांची यादी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आली.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील निर्गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार झपाट्याने कामाला लागले आहे. मार्च २०२२ पर्यंत देशभरातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण करण्याचे टार्गेट सरकारने ठेवले आहे. एअर इंडियाच्या विक्रीनंतर खासगीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. नॅशनल माॅनिटायझेशन प्लॅन अंतर्गत सरकार २५ एअरपोर्टसचे खासगीकरण करणार आहे. त्यातील १३ विमानतळांची निवड करण्यात आली आहे.

इंधन दर ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
भारतीय विमानातळ प्राधिकरण अर्थात एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या ताब्यातील १३ एअरपोर्ट खासगी गुंतवणूकदारांना विक्री केले जाणार आहेत. नुकताच १३ विमानतळांची यादी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आली. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) या विमानतळांसाठी बोली लावली जाईल, अशी माहिती एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’शी बोलताना दिली. निविदा प्रक्रिया या वर्षअखेर पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र ही १३ विमानतळे कोणती याबाबत अधिक माहिती त्यांनी देणं टाळले.

ICICI बँंकेच्या शेअरमध्ये मोठी वाढ; गाठला रेकॉर्ड स्तर, हे आहे त्यामागचे कारण
प्रती प्रवासी या तत्वावर विमानतळांचे खासगीकरण केले जाणार आहे. अशा प्रकाराचा प्रयत्न ग्रेटर नोएडामधील जेवर एअरपोर्टच्या खासगीकरणावेळी करण्यात आला होता, असे कुमार यांनी सांगितले. अल्प मुदतीसाठी किंवा किमान ५० वर्षांसाठी हे एअरपोर्ट्स खासगी गुंतवणूकदारांना हाताळणीसाठी दिले जातील, असे त्यांनी सांगितले.

चार सत्रांनंतर पडझड थांबली; आज सेन्सेक्स-निफ्टी वधारले, या शेअरमध्ये तेजीची लाट
दरम्यान, सात लहान विमानतळांचे सहा मोठ्या एअरपोर्ट्समध्ये रुपांतर केले जाणार आहे. ज्यात वाराणसीचा कुशीनगर आणि गयामध्ये समावेश, अमृतसर आणि कांग्रा यांचे एकत्रीकरण, भुवनेश्वरचे तिरुपती एअरपोर्टबरोबर एकत्रीकरण, रायपूरचे औरंगाबादशी एकत्रीकरण , इंदोर आई जबलपूर यांचे स्क्ट्रीकरण आणि त्रिची आणि हुबळी या विमानतळांचे एकत्रीकरण केले जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: