Ashram 3 Controversy: स्क्रिप्ट वाचल्यानंतरच चित्रिकरणाला परवानगी देणार, साध्वींची नवी ‘सेन्सॉरशीप’


हायलाइट्स:

  • साधू-संत सिनेमे पाहत नाहीत, पण स्क्रिप्ट वाचणार : साध्वी प्रज्ञा
  • खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची नवी ‘सेन्सॉरशीप’
  • ‘धर्माला चुकीच्या पद्धतीनं दाखवणारा कंटेन्ट हटवल्यानंतरच परवानगी’

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये रविवारी प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम-३‘ या वेबसीरीजच्या चित्रिकरण सेटवर ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसंच दिग्दर्शकाच्या तोंडावर शाईही फेकली. अशा पद्धतीच्या चित्रिकरणातून ‘हिंदुत्वाचा अपमान’ केला जात असल्याचं हल्लेखोरांचं म्हणणं होतं. याच बद्दल स्थानिक भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कारवाईबद्दल विचारलं असता त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

हिंदू धर्माचा अपमान?
‘भारतात राहून सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही’, असं म्हणत त्यांनी बजरंग दलाची बाजू उचलून धरली. सोमवारी मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही वेबसीरीजचं नाव बदलण्याची मागणी केलीय. ‘बहुसंख्यांक समाजा’ची भावना लक्षात घेता दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘आश्रम’ वेबसीरीजचं नाव बदलण्याच्या मागणीवर विचार करायला हवा. तोडफोड चुकीची असून त्यावर कारवाई सुरू आहे, मात्र वेबसीरीजला ‘आश्रम’ हे नाव का देण्यात आलं? असा प्रश्नही गृहमंत्र्यांनी विचारला.

Madhay Pradesh: अभिनेता बॉबी देओलला धुंडाळत बजरंग दलाचा ‘आश्रम’च्या सेटवर हल्ला
Fuel Price: ‘लसीकरणाची शंभरी झाली, आता इंधनांची शंभरीही साजरी करा’
‘…तरच सिनेमाला परवानगी’

साधू-संत सिनेमे पाहत नाहीत, परंतु यापुढे एक वेगळा विभाग बनवला जाईल. आता कोणताही सिनेमा बनवला जाण्यापूर्वीच हा विभाग त्याची स्क्रिप्ट वाचणार… धर्माला चुकीच्या पद्धतीनं दाखवणारे फोटो, दृश्य, व्हिडिओ हटवल्यानंतरच सिनेमा बनवण्याची आणि प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाईल, असंही म्हणत आपल्या वेगळ्या ‘सेन्सॉरशीप’चा मानसही त्यांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार

यासंबंधी आपण राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना एक पत्र लिहिणार असल्याचंही साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलंय. ‘अशा पद्धतीच्या चित्रिकरणाला परवानगी कशी देण्यात आली? परवानगीपूर्वी स्क्रिप्ट वाचली होती का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणार’ असल्याचं वक्तव्यही साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलंय.

अशा पद्धतीच्या सिनेमांतून हिंदू सनातन धर्माच्या व्यवस्थेला आणि धर्माला कलंकित करण्याचा प्रयत्न केला जातो, या प्रयत्नांना परवानगी नाकारायला हवी. असं चित्रिकरण करण्यात आलं तर त्यावर विरोध व्यक्त करायला हवा. अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करायला हवी, असंही साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटलंय.

Ind Vs Pak: पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव, हॉस्टेलमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला
amit shah in srinagar : ‘पाकिस्तानशी चर्चा करण्यापेक्षा आम्ही काश्मीरच्या तरुणांशी आणि जनतेशी बोलू’

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह या ‘भारत भक्ती आखाड्या’च्या अध्यक्षस्थानी आहेत. सोमवारी ‘अखिल भारतीय संत समिती’च्या प्रतिनिधिमंडळानं ‘आश्रम’ या वेबसीरीजचं शुटिंग रोखण्याची मागणी केली.

वेबसीरीजचं नाव बदलण्याची मागणी

रविवारी भोपाळमध्ये आश्रम ३ च्या शुटिंग सेटवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या तोंडाला शाई फासून शुटिंगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत त्यांना मारहाणही करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व्हॅनिटी व्हॅन सहीत पाच वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

Amit Shah: बुलेटप्रुफ काच हटवत अमित शहांचं काश्मीरमध्ये भाषण, CRPF कॅम्पमध्ये मुक्काम
kiran gosavi : फरार किरण गोसावीची कोंडी; लखनऊ पोलिसांचा नकार, तर पुणे पोलिसांचं पथक रवाना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: