Amit Shah: बुलेटप्रुफ काच हटवत अमित शहांचं काश्मीरमध्ये भाषण, CRPF कॅम्पमध्ये मुक्काम


हायलाइट्स:

  • गृहमंत्री अमित शहा यांचा जम्मू काश्मीर दौरा
  • सीआरपीएफ कॅम्पमध्ये मुक्काम ठोकत जवानांसोबत घेतलं भोजन
  • श्रीनगर ते पुलवामाच्या लेतपुरा सीआरपीएफ कॅम्पचा जवळपास २० किलोमीटरचा प्रवास रस्तेमार्गानं केला पूर्ण

श्रीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरच्या आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात थोडी वाढ केलीय. पुलवामाच्या लेथपुरामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या शिबिरातच त्यांनी आपला सोमवारी रात्रीचा मुक्काम ठोकला. याच भागात फेब्रुवारी २०१९ मध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात तब्बल ४० जवानांनी आपले प्राण गमावले होते.

यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनहरच्या एका जाहीर सभेत भाषणही केलं. आपल्या भाषणापूर्वी समोरच्या बुलेटप्रुफ काचा हटवण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसंच कोणत्याही सुरक्षेविना श्रीनगर भागात अमित शहा यांनी भाषण केलं.

आपल्या मनातून भीती काढून टाका. दहशतवाद मानवतेविरुद्ध आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही, असं यावेळी अमित शहा यांनी उपस्थितांसमोर म्हटलं.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांना आपल्या निशाण्यावर घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांचा हा दौरा आयोजित करण्यात आलाय. आपल्या या दौऱ्यात स्थानिकांनी घाबरून जाऊ नये आणि दहशतवादाचा मुकाबला करावा, असा संदेश आपल्या भाषणातून आणि प्रत्येक कृतीतून देण्याचा प्रयत्न गृहमंत्र्यांनी केला.

amit shah in srinagar : ‘पाकिस्तानशी चर्चा करण्यापेक्षा आम्ही काश्मीरच्या तरुणांशी आणि जनतेशी बोलू’
Ind Vs Pak: पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव, हॉस्टेलमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला
आपल्या या दौऱ्यात श्रीनगर ते पुलवामाच्या लेतपुरा सीआरपीएफ कॅम्पचा जवळपास २० किलोमीटरचा प्रवास त्यांनी रस्तेमार्गानं पूर्ण केला.

सोमवारी सीआरपीएफ कॅम्पमध्ये जवानांना संबोधित करताना, दहशतवादासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची ‘झीरो टॉलरन्स‘ नीती असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसचं देशाचा सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं. जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी गृहमंत्र्यांनी आपली रात्र पुलवामाच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये जवानांसोबतच मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला.

यावेळी, अमित शहांनी जवानांसोबत बसून भोजन घेतलं आणि गप्पाही मारल्या. यावेळी, त्यांनी जवानांचं मनोबल वाढवताना त्यांच्या मानसिक शक्तीचं कौतुक केलं. खुद्द गृहमंत्र्यांनी आपल्यासोबत भोजन करणं आमच्यासाठी गौरवाचा क्षण असल्याची भावना जवानांनी व्यक्त केली.

nitin gadkari : नितीन गडकरी म्हणाले, ‘सरकारमध्ये उच्चस्तरावर मोठ्या प्रमाणावर अहंकार…’
kiran gosavi : फरार किरण गोसावीची कोंडी; लखनऊ पोलिसांचा नकार, तर पुणे पोलिसांचं पथक रवानाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: