‘२५ कोटींचे वसुली प्रकरण हे हिमनगाचे टोक, मालक व नोकरांनी सावध राहावे’


हायलाइट्स:

  • समीर वानखेडेंवर लाचखोरीचा आरोप
  • शिवसेनेनं साधला वानखेडेंवर निशाणा
  • सामनाच्या अग्रलेखातून केलं भाष्य

मुंबईः ‘भाजपला जर सर्व तपास यंत्रणांचे मालक आपणच आहोत असे मानून चालत असेल तर लोकशाहीत मालक बदलत असतात. हे भाजपने व त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी पक्के लक्षात घेतले पाहिजे. खोटो साक्षीदार, बेताल बडबड, बँकांना, सार्वजनिक संस्थांना हजारो कोटींचा गंडा घालून पुन्हा आर्यन खानसारख्या प्रकरणातही वसुली करणाऱ्यांच्या हाती पक्षाच्या नाड्या आहेत. या नाड्यांची गाठ कधीही सैल होईल. २५ कोटींचे वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक व त्यांच्या नोकरांनी सावध राहावे,’ असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेनं आर्यन खान (aryan khan drug case) प्रकरणावरुन भाजपवर टीका केली आहे.

‘कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात काही तरुण पोरांनी अमली पदार्थाचे सेवन केले किंवा बाळगले. सत्य काय ते त्या धाडबाज व घबाडबाज अधिकार्यांनाच माहीत. त्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगाही सापडला. खानचा मुलगा आर्यन याच्यामुळं या प्रकरणास वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे. त्या प्रसिद्धीमुळं एनसीबीचे उत्सवमूर्ती अधिकारी बेबंद व बेभान झाले. सुशांतसिंह चक्रवर्तीस तुरुंगात पाठवणारे हेच अधिकारी होते. रियाकडे कोणतेही अमली पदार्थ मिळाले नव्हते. सुशांत अमली पदार्थांचे सेवन करत होता हे खरे. हे पदार्थ देणाऱ्या घेणाऱ्यांना रियाच्या बँक खात्यातून चार हजार रुपये गेले होते. या चार हजारांची किंमत म्हणून रियाला महिनाभर तुरुंगात रहावे लागले,’ अशा शब्दांत शिवसेनेनं समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

समीर वानखेडे यांना पदावरून हटवणार का?; NCBचे उपमहासंचालक म्हणाले…

‘चार हजारांच्या रुपयांच्या अमली पदार्थांची चौकशी करणे हे एनसीबीचे काम नाही. त्यासाठी मुंबई पोलिसांचे स्वतंत्र अमली पदार्थविरोधी पथक आहे व मुंबई पोलिस अधूनमधून कोट्यवधी रुपयांचा माल पकडत असतात व नष्टही करतात. पण ते फालतु प्रसिद्धीसाठी उद्योग करत नाहीत,’ असंही शिवसेनेनं सुनावलं आहे.

किरण गोसावी आला समोर, सर्व आरोप फेटाळले; म्हणाला, ‘आर्यननेच मला…’

‘कॉर्डेलिया क्रुझवर एक- दोन अमली पदार्थ सापडले व त्याचा मोठा उत्सव एनसीबीच्या समीर वानखेडे नामक अधिकाऱ्याने केला. त्याच दरम्यान गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ३५००० किलोचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत २५ हजार कोटी इतकी आहे. या बंदराचे मालक उद्योगपती अदानी आहेत. त्यामुळं प्रसिद्धी व कारवाईच्या बाबतीत ३५०० किलो हेरॉइनवर मुंबईच्या क्रुझवरील एक ग्रॅम चरस भारी पडले,’ असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

एनसीबी, समीर वानखेडे यांची ‘ती’ विनंती NDPS कोर्टाने फेटाळलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: