नाट्य कला साहित्य क्षेत्रात आता पुन्हा एकदा कलेच्या अवकाशात इंद्रधनुष्य खुलेल – विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नकारात्मक भूतकाळ विसरून आता उगवत्या लख्ख पहाटेचे स्वागत करू – डॉ.नीलम गोऱ्हे

    पुणे,25/10/2021: कोरोना महामारीचे काळे ढग दूर सारून नाट्य कला साहित्य क्षेत्रात आता पुन्हा एकदा कलेच्या अवकाशात इंद्रधनुष्य खुलेल,असा विश्वास महाराष्ट्र शासनाच्या विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.नीलम गो-हे यांनी आज व्यक्त केला. 

     महाराष्ट्र शासनाने 22 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील तमाम नाट्यगृह खुली करण्याचा स्वागतार्ह  निर्णय जाहीर केला आहे. त्याला अनुसरून सर्व नाट्यगृह आजपासून सुरु होत आहेत, ह्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी संवाद पुणे तर्फे नटराज पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संवाद पुणेचे सुनील महाजन,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, अभिनेत्री लीला गांधी आदी सिने-नाट्य सृष्टीतील कलाकार, रंगमंच मागील कलाकार आणि तंत्रज्ञ मोठ्य़ संख्येने उपस्थित होते. 

प्रदीर्घ काळानंतर बालगंधर्वमध्ये निनादली तिसरी घंटा

        डाॅ.नीलम गो-हे म्हणाल्या,कोरोनासारख्या महामारीमुळे गेली दीड-दोन वर्षे सांस्कृतिक क्षेत्र झाकोळले गेले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी घडणा-या पुणेकरांना घरात कोंडून घ्यावे लागले. यामुळे कलाकार तर त्रस्त झालेच त्याच बरोबर रसिक पुणेकरांना देखील खूप त्रास झाला. या काळात अनेकांना मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागले. लोकांनी  आत्महत्यासारखे पाऊल उचलण्यापर्यंत विचार केला. पंरतू हा सगळा नकारात्मक भूतकाळ विसरून आता उगवत्या लख्ख पहाटेचे स्वागत करायचे आहे. 

 अभिनेत्री लीला गांधी यांनी यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले . अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: