हायलाइट्स:
- खून प्रकरणात आठ महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा
- मुलानेच जन्मदात्या वडिलांचा साडीने गळा आवळला
- तब्बल आठ महिन्यानंतर गुन्ह्याची उकल
वडील अतिप्रमाणात मद्य प्राशन करत असल्यामुळे व आईला घरात वारंवार त्रास देत असल्याचा मनात राग धरून अल्पवयीन मुलानेच जन्मदात्या वडिलांचा गळा आवळल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल आठ महिन्यानंतर या गुन्ह्याची उकल झाली आहे.
घरातील इतर लोकांची दिशाभूल करण्यासाठी वडिलांनी गळफास घेतला असा बनाव करण्यात आला होता. पिंटू महादू घोंगडे ( वय ३८ वर्ष ) असं मयताचं नाव आहे, तर शिवम पिंटू घोंगडे (वय १५ वर्ष ) असं आरोपीचं नाव आहे.
दरम्यान, पोलीस नाईक बालाजी जोगदंड यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.