हायलाइट्स:
- सावनेर पोलिसांचा कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील डान्सबारवर छापा.
- नोकरासह चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
- यावेळी पाच तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करताना पोलिसांना आढळल्या.
छापेवाड्यातील शिवम बारमध्ये डान्सबार सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना मिळाली. मगर यांनी सावनेर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, सतीश पाटील, उपनिरीक्षक प्रियंका गेडाम, राजेंद्र यादव, संजय शिंदे, मनीषा बंडीवार, विशाल इंगळे यांनी सापळा रचला. रविवारी रात्री पोलिसांनी शिवम बारमध्ये छापा टाकला.
क्लिक करा आणि वाचा- खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू; अँटॉप हिलच्या सीजीएस काॅलनीतील घटना
यावेळी पाच तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करताना पोलिसांना आढळल्या. पोलिसांनी त्यांच्यासह नोकर व व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. याबारमधून पोलिसांनी रोख रकमेसह सव्वा लाखाचे साहित्य जप्त केले. बारबाला मुंबईच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा- राज्याला मोठा दिलासा; आज करोना रुग्णसंख्येची निचांकी घट; मृत्यूही घटले
क्लिक करा आणि वाचा- वानखेडे प्रकरणी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची काय झाली चर्चा?; गृहमंत्री म्हणाले…