नवी दिल्लीः मुंबईतील एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे दिल्लीत (
sameer wankhede reaches delhi ) पोहोचले आहेत. अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (
aryan khan case ) हा तुरुंगात आहेत. या प्रकरणी वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे दिल्लीत पोहोचले असल्याने त्यांच्या हालचालीवर माध्यमांचं लक्ष आहे.
एनसीबीचे अधिकारी समीवर वानखेडे दिल्लीत पोहोचताच त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. यावर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे. आपल्याला समन्स बजावण्यात आलेलं नाही, असं वानखेडे म्हणाले. आपल्याला दिल्लीतून समन्स बाजवण्यात आलेलं नाही. आपण इथे वेगळ्या कारणासाठी आलो आहोत. आपल्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, ते निराधार आहेत, असं समीर वानखेडे म्हणाले.
sameer wankhede : समीर वानखेडे दिल्लीला रवाना, अटक टाळण्यासाठी मुंबईतून बदली होणार?
अंमली पदार्थ प्रकरणी मुंबईत क्रूझवर एनसीबीने टाकेल्या छाप्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर काही जणांना अटक करण्यात आली. तसंच त्यांची रवानगी तुरुंगात केली गेली. आता छाप्यावर साक्षीदार असलेल्या मुंबईतील प्रभाकर साईल याने समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणी समीर वानखेडेंची दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे दिल्लीत दाखल झाले आहेत.
sameer wankhede : समीर वानखेडेंना झटका! चौकशी होणार, दिल्लीतील अधिकारी येणार, सूत्रांची माहिती