तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलंय; घरबसल्या तपासा ही महत्वाची माहिती, कशी ते जाणून घ्या


हायलाइट्स:

  • आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे.
  • सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्डची सर्वात आधी गरज भासते.
  • कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो सगळीकडे आधारची मागणी केली जाते.

नवी दिल्ली : आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्डची सर्वात आधी गरज भासते. बँक खाते उघडायचे असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो की एलपीजी सिलिंडरचे अनुदान घ्यायचे असो, आधार क्रमांकाची जवळपास सगळीकडे मागणी केली जाते.

चार सत्रांनंतर पडझड थांबली; आज सेन्सेक्स-निफ्टी वधारले, या शेअरमध्ये तेजीची लाट
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या आधार कार्डचा कुठेतरी गैरवापर होत आहे, तर तुम्ही हे सोप्या मार्गाने जाणून घेऊ शकता. आधार क्रमांक प्रसिद्ध करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे, हे तपासण्यासाठी खास सुविधा पुरवते आहे.

स्मार्ट गुंतवणूक; मल्टी असेट श्रेणीत ‘या’ योजनेने दिला दमदार परतावा
आधार प्रमाणीकरणचा इतिहास (ऑथेंटिकेशन हिस्ट्री) असा तपासा –
– सर्वात आधी तुम्ही आधार क्रमांक प्रसिद्ध करणाऱ्या यूआयडीएआय (UIDAI)च्या अधिकृत वेबसाइटवर जा. https://resident.uidai.gov.in.
– यानंतर आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री (Aadhaar Authentication History) वर क्लिक करा.
– आता तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका.
– त्यानंतर ‘जनरेट ओटीपी’ वर क्लिक करा.
– ओटीपी टाकल्यानंतर माहितीचा कालावधी आणि व्यवहारांची संख्या (ट्रान्जॅक्शन) द्यावी लागेल.
– आता निवडलेल्या कालावधीसाठी प्रमाणीकरण (ऑथेंटिकेशन) विनंतीचे तपशील स्क्रीनवर दिसून येतील.

आयटी क्षेत्रात गुंतवणूक संधी; बिर्ला म्युच्युअल फंडाचा ‘निफ्टी आयटी ईटीएफ’ खुला
तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या वापरामध्ये काही गैरवापर झाल्याचा संशय असल्यास किंवा काही अनियमितता आढळल्यास तुम्ही ताबडतोब यूआयडीएआय (UIDAI) टोल फ्री क्रमांक – १९४७ वर किंवा [email protected] येथे ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.

वाचा : फिनो पेमेंट्स बँंकेचा IPO ; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या पूर्ण योजनेचा पूर्ण तपशीलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: