खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू; अँटॉप हिलच्या सीजीएस काॅलनीतील घटना


हायलाइट्स:

  • उद्यानाच्या सुशोभीकरण कामासाठी कंत्राटदाराने खोदलेल्या खड्डयातील पाण्याचा पडून दोन मुलांचा मृत्यू.
  • यशकुमार चंद्रवंशी आणि शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावे.
  • अँटॉप हिलच्या सीजीएस कॉलनीमधील सेक्टर ७ मध्यील एका उद्यानात ही घटना घडली.

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

उद्यानाच्या सुशोभीकरण कामासाठी कंत्राटदाराने खोदलेल्या खड्डयातील पाण्याचा पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना अँटॉप हिलच्या सीजीएस कॉलनीजवळ घडली. यशकुमार चंद्रवंशी (११) आणि शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावे असून याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. (two children have died after falling into a pit dug by a contractor for beautification of a park in sector 7 in cgs colony of antop hill)

सीजीएस कॉलनीमधील सेक्टर ७ मध्ये उद्यान आहे. या उद्यानाच्या सुशोभिकरणाचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराने उद्यानात मोठा खड्डा खणला असून तो उघडा असल्याने पाण्याने भरला आहे. काम अर्धवट असतानाही उद्यान सुरु असल्याने परिसरातील मुले खेळण्यासाठी या उद्यानात जातात. सोमवारी अनेक मुले खेळत असताना यशकुमार आणि शिवम संध्याकाळी पाचच्या सुमारास या खड्ड्यात पडले. पोहता येत नसल्याने त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले. इतर मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला असलेल्या लोकांना सांगितले. त्यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना प्राचारण केले. दोन्ही मुलांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- राज्याला मोठा दिलासा; आज करोना रुग्णसंख्येची निचांकी घट; मृत्यूही घटले

यशकुमार आणि शिवम याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असताना कंत्राटदाराविरुद्ध लोकांचा संताप आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांमार्फत रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

क्लिक करा आणि वाचा- वानखेडे प्रकरणी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची काय झाली चर्चा?; गृहमंत्री म्हणाले…
क्लिक करा आणि वाचा- चोरट्यांना समजलेच नाही; सोने नाही म्हणून ९ लाखांचे हिरे फोडून फेकून दिलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: