हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ८८९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण १ हजार ५८६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात झालेल्या १२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ३७ हजार ०२५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४७ टक्के इतके आहे.
क्लिक करा आणि वाचा- वानखेडे प्रकरणी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची काय झाली चर्चा?; गृहमंत्री म्हणाले…
सक्रिय रुग्णसंख्येचा ग्राफ घसरला
आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजार १८४ इतकी आहे. काल ही संख्या ३२ हजार ११५ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ६ हजार ९२३ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ४३१, तर अहमदनगरमध्ये ही संख्या २ हजार २५५ इतकी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६७४ अशी आहे. तसेच, सांगलीत एकूण ५९३ इतकी आहे. तर, सोलापुरात ही संख्या ४८८ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- भोसरी जमीन घोटाळा प्रकरण: एकनाथ खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा
मुंबईत उपचार घेत आहेत ४,९७९ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ९७९ इतकी आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५९३, रत्नागिरीत २२९ इतकी कमी झाली आहे, तर सिंधुदुर्गात ती ४५७ इतकी आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकही सक्रिय रुग्ण नाही
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ३७९, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ८२ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १४ वर आली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात आज एकही सक्रिय रुग्ण नाही.
क्लिक करा आणि वाचा- एनसीबी, समीर वानखेडे यांची ‘ती’ विनंती NDPS कोर्टाने फेटाळली
१,८३,०९२ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी १९ लाख ७८ हजार १५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ०३ हजार ८५० (१०.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ८३ हजार ०९२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ९५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.