हायलाइट्स:
- दुसऱ्या तिमाहीत आयसीआयसीआय बँकेची कामगिरी सुधारली आहे.
- आयसीआयसीआय बँकेचा शेअर १५ टक्क्यांची वाढ घेत विक्रमी पातळी गाठली.
- या तेजीने गुंतवणूकदार सुखावले.
ट्रम्प यांचे नाव जोडताच मिळाला सोन्याचा भाव ; तब्बल १६५७ टक्क्यांनी वधारलाय ‘हा’ शेअर
दुसऱ्या तिमाहीत आयसीआयसीआय बँकेची कामगिरी सुधारली आहे. या तीन महिन्यात बँकेच्या कर्ज वितरणात मोठी वाढ झाली असून अर्थव्यवस्था करोना संकटातून पूर्णपणे सावरली असल्याचे संकेत आहेत. नुकताच एचडीएफसी बँकेने दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केली होती. आयसीआयसीआय बँकेला दुसऱ्या तिमाहीत ५५११ कोटींचा नफा झाला. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के वाढ झाली. तसेच निव्वळ व्याजातून बँकेला ११६९० कोटींचा महसूल मिळाला होता.
आयटी क्षेत्रात गुंतवणूक संधी; बिर्ला म्युच्युअल फंडाचा ‘निफ्टी आयटी ईटीएफ’ खुला
बँकेच्या एकूण कर्ज वितरणात १७ टक्के वाढ झाली असून या तिमाहीत कर्ज वितरणाचा आकडा ७.६४ लाख कोटींवर गेला. बिझनेस बँकिंग विभागात ४३ टक्के वृद्धी झाली आहे. तसेच बुडीत कर्जाचे प्रमाण देखील कमी झाले असल्याचा दावा बँकेने केला आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत बँकेने ५४८२ कोटींची कर्ज वसुली केली. पहिल्या तिमाहीत ३६२७ कोटीची कर्ज वसुली करण्यात आली होती.
इंधन दर ; पाच दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
या दमदार कामगिरीचे पडसाद आज शेअर बाजारात उमटले. आयसीआयसीआय बँकेच्या शेअरने आज इंट्रा डेमध्ये ८६७ रुपयांची विक्रमी पातळी गाठली. चालू वर्षात बँकेच्या शेअरमध्ये तब्बल ४२ टक्के वाढ झाली आहे. याच काळात निफ्टी बँक इंडेक्स २९ टक्क्यांनी वाढला आहे.
चार सत्रांनंतर पडझड थांबली; आज सेन्सेक्स-निफ्टी वधारले, या शेअरमध्ये तेजीची लाट
बाजार बंद होताना आयसीआयसीआय बँकेचा शेअर १०.८० टक्क्यांनी वधारून ८४१.०५ रुपयांवर स्थिरावला. बँकेचे बाजार भांडवल ५८३३५२.२९ कोटींपर्यंत वाढले. आयसीआयसीआय बँकेची कामगिरी पाहता अनेक ब्रोकर्सने नजीकच्या काळात हा शेअर ९०० ते १००० रुपये पर्यंत वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे.