amit shah in srinagar : ‘पाकिस्तानशी चर्चा करण्यापेक्षा आम्ही काश्मीरच्या तरुणांशी आणि जनतेशी बोलू’


श्रीनगरः जम्मू -काश्मीर दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी श्रीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केलं. आपल्याला टोमणे मारले गेले आणि शाप दिला. भारत सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी, असा सल्ला फारुख अब्दुल्ला यांनी दिला. पण चर्चाच करायची असेल तर आम्ही काश्मीर खोऱ्यातील जनतेशी आणि तरुणांशी करू, त्यांच्याशी बोलू, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचं नवं पर्व सुरू होणार आहे. काश्मीर खोऱ्याचा आणि लडाखचा विकास व्हावा, याच उद्देशाने पाऊल उचलण्यात आले आहे. काश्मीरला जे हवे आहे ते २०२४ पूर्वी सर्वांच्या डोळ्यांसमोर असेल. काश्मीर खोऱ्यातील नागरिकांनी मनातील भीती काढून टाकानीस काश्मीरची शांतता आणि विकासाच्या मार्गात कोणीही अडथळा आणू शकत नाही. यासाठी तुम्ही भारत सरकारवर आणि आमच्यावर विश्वास ठेवा, असं शहा म्हणाले.

Himachal Pradesh: बर्फवृष्टीनंतर किन्नौरमध्ये मोठी दुर्घटना, महाराष्ट्रातील तीन ट्रेकर्सचा मृत्यू

देशावर जितका अधिकार माझा आहे, तितकाच अधिकार काश्मीरच्या जनतेचा आहे. काश्मीर पंतप्रधान मोदींच्या हृदयात आहे. आम्हाला काश्मीर खोऱ्यातील तरुणांशी मैत्री हवी आहे. काश्मीरच्या विकासात अडथळे आणणाऱ्यांचा हेतू वाईट आहे. जम्मू -काश्मीरमध्ये सर्वप्रथम १०० टक्के लसीकरण करण्यात आले. आता तुमच्यापैकी कोणीही मुख्यमंत्री होऊ शकतो, असं आवाहन अमित शहांनी केलं.

जम्मू काश्मीर : शहिदाच्या पत्नीला अमित शहांकडून थेट नियुक्तीपत्र!

गेल्या ७० वर्षांपासून तुम्हाला अधिकारांपाकून का वंचित ठेवलं गेलं? काश्मीरच्या तरुणांनी दगड उचलू नये, अशी आमची इच्छा आहे. काश्मीरला स्वतःचा मुख्यमंत्री असावा, जो लंडनला जाणार नाही. काश्मीरमधील तरुणांची दिशाभूल केली जात आहे. काश्मीरमधील तरुणांना ७० वर्षांपासून जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्याचा अधिकार का दिला नाही?, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्कालीन सरकारला केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: