हायलाइट्स:
- समीर वानखेडे प्रकरणी माझी आणि मुख्यमंत्र्यांची जुजबी चर्चा झाली- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.
- या चर्चेबाबत मुख्यमंत्रीच सांगू शकतील, त्यांची भूमिका मी कशी सांगणार?- वळसे पाटील.
- प्रभाकर साईल-वानखेडे प्रकरणी कोणी तक्रार दिली तर पोलीस त्यावर कारवाई करतील- वळसे पाटील.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र माझ्या पाहण्यात आले असून, त्यांना त्यांच्या स्वत:च्या जीवाची भिती वाटत आहे. यासाठी त्यांनी संरक्षण मागितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना संरक्षण पुरवलेले आहे, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा- भोसरी जमीन घोटाळा प्रकरण: एकनाथ खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा
वानखेडे प्रकरणी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आपल्याला भेटून तक्रार करणार होते, असे सांगत त्याबाबत पत्रकारांनी विचारल्यानंतर वळसे पाटील म्हणाले की, नवाब मलिक आणि माझी भेट झालेली नाही. ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यग्र आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचे काय म्हणणे आहे हे समजून घेऊन पुढील जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही करू.
क्लिक करा आणि वाचा- एनसीबी, समीर वानखेडे यांची ‘ती’ विनंती NDPS कोर्टाने फेटाळली
तक्रार आल्यास कारवाई करू- वळसे पाटील
प्रभाकर साईल यांनी दिलेल्या माहितीवरून एफआयआर दाखल करणार का, असा प्रश्न पत्रकारांना गृहमंत्री वळसे पाटील यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना वळसे पाटील म्हणाले की, एफआयआर दाखल करण्यासाठी कोणीतरी तक्रार दाखल करावी लागते. जर या प्रकरणी कोणी तक्रार दिली तर पोलीस त्यावर कारवाई करतील.
क्लिक करा आणि वाचा:आता खेळ सुरू झालाय, इंटरव्हलनंतरचा स्क्रीनप्ले मी सांगणारः संजय राऊतांचा इशारा
‘वानखेडे प्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी जुजबी चर्चा’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत समीर वानखेडे प्रकरणावर आपली जुजबी चर्चा झाल्याची माहिती देत वळसे पाटील यांनी यावर अधिक बोलणे टाळले. मात्र, ही जुजबी चर्चा काय झाली, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते स्वत:च स्पष्ट करतील, त्यांची भूमिका मी कशी सांगणार असे वळसे पाटील म्हणाले.