भुवनेश्वरः महागड्या स्मार्टफोनसाठी किडनी विकल्याची प्रकरणं समोर (
husband sells wife ) आली होती. पण ओडिशामधील एका अल्पवयीन मुलाने आपल्या नवविवाहित पत्नीला एका ५५ वर्षीय व्यक्तीला विकले. महागड्या स्मार्टफोनसाठी त्याने पत्नीला विकल्याचा आरोप आहे. राजस्थानमधील बोलंगीर इथल्या राहणाऱ्या या १७ वर्षीय तरुणाने आपल्या पत्नीचा १.८० लाख रुपयांमध्ये सौदा केला. दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी अल्पवयीन मुलाने आधी २४ वर्षीय तरुणीशी सोशल मीडियावर मैत्री केली आणि नंतर कुटुंबीयांच्या इच्छेनुसार लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसांनी मुलगा पैशाच्या चणचणीबद्दल बोलू लागला. त्यानंतर पत्नीसह रायपूरमध्ये काम करण्यासाठी घराबाहेर पडला.
तिथून त्याने राजस्थानमधील एका ५५ वर्षीय व्यक्तीशी त्याने १.८० लाखांत पत्नीचा सौदा केला. या पैशातून त्याने एक महागडा स्मार्टफोन घेतला आणि उरलेले पैसे खर्च करून तो ओडिशाला परतला. कुटुंबीयांनी त्याला पत्नीबद्दल विचारले. ती एका पुरुषासोबत पळून गेली आहे, असं त्याने सांगितलं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला बाल न्यायालयात हजर केले. तिथून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
mahakal in ujjain : पत्नीची शेवटची इच्छा! इंजीनिअरने महाकालच्या चरणी अर्पण केले १७ लाखांचे दागिने
Himachal Pradesh: बर्फवृष्टीनंतर किन्नौरमध्ये मोठी दुर्घटना, महाराष्ट्रातील तीन ट्रेकर्सचा मृत्यू
Source link
Like this:
Like Loading...