पराभवाचा झटक्यानंतर टीम इंडियाचे टेन्शन वाढले; हा खेळाडू रुग्णालयात


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच लढतीत भारताला पाकिस्तानकडून १० विकेटनी पराभवाचा धक्का बसाल. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानकडून झालेला हा पहिला पराभव ठरला. भारताने या सामन्यात ऑलराउंडर म्हणून शार्दूल ठाकूरच्या जागी हार्दिक पंड्याला झुकते माप दिले होते. पण संघाला हवी तशी कामगिरी तो करू शकला नाही. इतक नव्हे तर आता भारतीय संघाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

वाचा-पाकिस्तानी पत्रकाराचा प्रश्न ऐकून, विराटच्या तळपायाची आग मस्तकात गेली; पाहा Video

पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना जेव्हा अखेरच्या षटकात भारताला वेगवान धावा करण्याची गरज होती तेव्हा पंड्याला धावा करता आल्या नाहीत. पाचव्या क्रमांकावर गोलंदाजी करणाऱ्या पंड्याने ८ चेंडूत फक्त ११ धावा केल्या. हारिस रऊफने त्याला बाद केले. पंड्या गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नाही. तो १०० टक्के फिट नाही त्यामुळे टी-२० वर्ल्डकप संघात कसे काय घेतले याबद्दल अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.

वाचा- Video: हा तर इस्लामचा हिंदूंवरील विजय; पाकिस्तान गृहमंत्र्यांचे द्वेष पसरवणारे वक्तव्य

हार्दिकचा खराब फॉर्म संघासाठी डोकेदुखी ठरत असताना टीम इंडियाची टेन्शन आणखी वाढणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना हार्दिकच्या उजव्या खांद्याला दुखापत देखील झाली. त्यानंतर त्याला तातडीने स्कॅनिंगसाठी रुग्णालायत नेण्यात आले. त्याच्या जागी मैदानात फिल्डिंगसाठी इशान किशन आला होता.

वाचा- Video : रिस्पेक्ट! इतिहास रचल्यानंतर धोनीपुढे हाथ बांधून उभे राहिले पाकिस्तानी खेळाडू

गेल्या काही काळात हार्दिक खराब फॉर्ममध्ये आहे. फिटनेसमुळे तो गोलंदाजी देखील करत नाही. पण याआधी त्याने गोलंदाजीत आणि फलंदाजीत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याने आतापर्यंत ५० टी-२० सामन्यातील ३४ डावात ४९५ धावा केल्या आहेत. तर ४२ विकेट देखील मिळवल्या आहेत.

वाचा- Video : ‘पाकिस्तानविरुद्ध आपण हरणार’; महेंद्रसिंह धोनीची भविष्यवाणी खरी ठरली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: